१७ जागांसाठी ९४ उमेदवार रिंगणात

By admin | Published: January 6, 2015 01:02 AM2015-01-06T01:02:19+5:302015-01-06T01:02:19+5:30

पारशिवनी तालुक्यातील कन्हान-पिपरी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी येत्या १८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या नगर परिषदेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या

9 seats for 17 seats in the election | १७ जागांसाठी ९४ उमेदवार रिंगणात

१७ जागांसाठी ९४ उमेदवार रिंगणात

Next

सहा जणांची माघार : कन्हान-पिपरी नगर परिषद निवडणूक
नागपूर : पारशिवनी तालुक्यातील कन्हान-पिपरी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी येत्या १८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या नगर परिषदेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ सहा उमेदवारांनी माघार घेतली असून, एकूण ९४ उमेदवारांनी त्यांचे आव्हान कायम ठेवले आहे.
या नगर परिषदेची निवडणूक ही प्रभाग पद्धतीने होणार असून, त्यासाठी येथे चार प्रभागांची निर्मिती करण्यात आली आहे. या चार प्रभागांमधून एकूण १७ सदस्यांची निवड केली जाणार आहे. प्रभाग क्रमांक १ (अ) मध्ये अनिता पाटील, सोनाली नंदेश्वर, आशा बागडे, विशाखा पाटील, प्रभाग क्रमांक १ (ब) मध्ये योगेंद्र रंगारी, मिलिंद वाघमारे, तेजराव गजभिये, समशेर पुरवले, कमलेश मेश्राम, पंकज रामटेके, नरेंद्र वंजारी व नरेश बर्वे, प्रभाग क्रमांक १ (क) मध्ये अल्का काकडे, कांता कभे, सुषमा चोपकर, सरोज जयस्वाल व प्रमिला मते, प्रभाग क्रमांक १ (ड) मध्ये गेंदलाल काठोके, राजेंद्र ओमप्रकाश काकडे, प्रकाश गाथे, योगराज अवसरे, प्रमोद उपाध्याय, चिंतामण खवले, नरेश भोयर, दिनेश ढगे व शरद वाटकर रिंगणात आहेत.
प्रभाग क्रमांक २ (अ) मध्ये प्रेम रोडेकर, दिनेश ढोके, शैलेंद्र माटे, संजय चहांदे, सतीश भसारकर, सिंधू वाघमारे, शंकर चहांदे, प्रभाग क्रमांक २ (ब) मध्ये लीना उकांडे, अर्चना ढोबळे, वैशाली डोणेकर, कविता बढिये, माया भोयर, प्रभाग क्रमांक २ (क) मध्ये दीपावली मेश्राम, लक्ष्मी लाडेकर, गुंफा, तिडके, दुर्गा निकोसे, कलावती बावणे, प्रभाग क्रमांक २ (ड) मध्ये राजेश यादव, रोशन यादव, मनीष वैद्य, शेशराव बावणे, संतोष्रा ठकरेले, मनोज भोपळे, रवींद्र महाकाळकर, रतीराम सहारे, जितेंद्र धुमाळ आदी रिंगणात आहेत.
प्रभाग क्रमांक ३ (अ) मध्ये वंदना शेंडे, नितू गजभिये, बेबी रंगारी, कल्पना नितनवरे, प्रभाग क्रमांक ३ (ब) मध्ये राजू मेश्राम, शक्ती पात्रे, अजय लोंढे, डॅनियल शेंडे, मोरेश्वर खडसे, सुशीलकुमार कळमकर, प्रभाग क्रमांक ३ (क) मध्ये पुष्पलता बावणे, गौरी कनपटे, ककरुणा आष्टनककर, मनीषा चिखले, प्रभाग क्रमांक ३ (ड) मध्ये किशोर बेलसरे, सचिन घोडमारे, गणेश भोंगाडे, प्रदीप बावणे, सुधाकर राऊत.
प्रभाग क्रमांक ३ (इ) मध्ये नूरजहॉ शहा, आशा पनिकर, शालिनी मेश्राम, गीता बैस, नूरजहॉ पठाण, रेखा टाहणे आदींनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. (प्रतिनिधी)
२६ मतदान केंद्रांची निर्मिती
कन्हान - पिपरी नगर परिषदेची लोकसंख्या २७ हजार २७५ असून, मतदार संख्या २० हजार २७५ एवढी आहे. या मतदारांची बुथनिकया यादी १३ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. मतदानासाठी येथे एकूण २६ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि. ६) निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यानंतर प्रचाराला रितसर सुरुवात केली जाईल. मतदारांनी निर्भय वातावरणात मतदान प्रक्रियेत भाग घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा एसडीओ शेखर सिंह, तहसीलदार बाळासाहेब टेळे व मुुख्याधिकारी गीता वंजारी यांनी केले आहे.

Web Title: 9 seats for 17 seats in the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.