तोतलाडोहात ९० टक्के जलसाठा : २०१३ नंतर प्रथमच प्रकल्प भरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:34 AM2019-09-11T00:34:14+5:302019-09-11T00:35:32+5:30

मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पातून पाणी सोडल्याने तोतलाडोह प्रकल्पातील जलसाठा मंगळवारी सायंकाळी ५ पर्यंत ९० टक्के झाला आहे. जलसाठा ९५ टक्क्यावर पोहचल्यास प्रकल्पातील पाणी सोडावे लागणार आहे.

90% water reservoir in Totladoh: After 2013 the first time project filled | तोतलाडोहात ९० टक्के जलसाठा : २०१३ नंतर प्रथमच प्रकल्प भरला

तोतलाडोहात ९० टक्के जलसाठा : २०१३ नंतर प्रथमच प्रकल्प भरला

googlenewsNext
ठळक मुद्देजलसाठा पुन्हा वाढल्यास पाणी सोडणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पातून पाणी सोडल्याने तोतलाडोह प्रकल्पातील जलसाठा मंगळवारी सायंकाळी ५ पर्यंत ९० टक्के झाला आहे. जलसाठा ९५ टक्क्यावर पोहचल्यास प्रकल्पातील पाणी सोडावे लागणार आहे. याचा विचार करता जिल्हा प्रशासनाने पेंच व कन्हान नदीच्या काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. २०१३ मध्ये मध्य प्रदेशात चांगला पाऊ स झाला होता. त्यावेळी तोतलाडोहातून पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच हा प्रकल्प पुन्हा भरला आहे.
तोतलाडोह प्रकल्पात ९५ टक्के जलसाठा झाल्यास प्रकल्पातून पाणी सोडले जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तोतलाडोह ते नवेगाव खैरी(पेंच) प्रकल्पाचे अंतर ३० किलोमीटर आहे. तोतलाडोतून सोडलेले पाणी तीन तासानंतर या प्रकल्पात पोहचेल. नवेगाव खैरी प्रकल्पात सध्या १०२.९८ दलघमी जलसाठा आहे. तो एकू ण क्षमतेच्या ४५.०६ टक्के आहे.
रस्त्यांवर पाणी साचले
मंगळवारी सायंकाळी ४.४५ नंतर नागपूर शहर व परिसरात चांगला पाऊ स झाला. शहरातील रस्त्यांवर पुन्हा पाणी साचले होते. परंतु नागपूर विमानतळ परिसरात जोराचा पाऊ स न झाल्याने शहरातील पावसाची नोंद झाली नाही. हवामान विभागाने ७ सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला होता. शाळा -महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला होता. मात्र या तारखेला पाऊ स आला नाही. मंगळवारी पावसाने पुन्हा जोर पकडला. पूर्व, मध्य व दक्षिण नागपुरात चांगला पाऊ स झाला. शहराच्या इतरही भागात पाऊ स पडला पण त्यात जोर नव्हता. मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत नागपूर शहरात १.६ मि.मी. पावासाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ११ व १२ तारखेला चांगला पाऊ स होण्याची शक्यता आहे.
अंबाझरी, गोरेवाडा काठोकाठ भरले 


नागपूर शहरात मंगळवारपर्यंत ९८१ मि.मी. पाऊ स पडला. परंतु यंदाच्या पावसाळ्यात अंबाझरी व गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाले नाही. मात्र मंगळवारी दोन्ही तलाव काठोकाठ भरले. जोराचा पाऊ स झाल्यास गोरेवाडा व अंबाझरी ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. गोरेवाड्याची पाणी पातळी ३१४.५० मीटर झाली आहे. या प्रकल्पाची सर्वाधिक पाणी पातळी ३१५.६५ मीटर आहे. तर अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो पॉईंटच्या भिंतीच्या काठापर्यत पाणी आले आहे.

Web Title: 90% water reservoir in Totladoh: After 2013 the first time project filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.