९२ मंगल कार्यालय, लॉनची तपासणी, १८ वर आकारला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:07 AM2021-02-24T04:07:41+5:302021-02-24T04:07:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकातर्फे मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल, विविध संस्थांची अचानक तपसणी करण्याची मोहीम ...

92 Mars office, lawn inspection, 18 fined | ९२ मंगल कार्यालय, लॉनची तपासणी, १८ वर आकारला दंड

९२ मंगल कार्यालय, लॉनची तपासणी, १८ वर आकारला दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकातर्फे मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल, विविध संस्थांची अचानक तपसणी करण्याची मोहीम मंगळवारीही सुरू होती. दिवसभरात ९२ मंगल कार्यालय, लॉन, संस्था, प्रतिष्ठाने आदींची तपासणी करण्यात आली. कोविड नियमांचे उल्लघन केल्या प्रकरणी १८ जणांकडून १ लाख ८२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात ही कारवाई केली जात आहे. २५ फेब्रुवारीपासून मंगल कार्यालय, लॉन सभागृहातील कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. ती ७ मार्चपर्यत राहणार आहे. यामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी विवाह समारंभ आयोजित करण्यात आले होते. पथकांनी ९२ ठिकाणी तपासणी केली.

यात लक्ष्मीनगर झोनमधील जानकी लॉन -२५ हजार अर्नव अ‍ॅकडमी छत्रपती चौक ५ हजार रामजी -शामजी पोहेवाला ५ हजार, धरमपेठ मधील क्षत्रिय सभागृहावर १० हजार, हनुमानगर झोन मधील प्रीन्स लॉन १५ हजार, नरसाळा येथे घरी आयोजित लग्न समारंभ ५ हजार, धंतोली झोन मधील ओम बार -२ हजार,किर्ती रेस्टारंन्ट पुरुषोत्तम नगर -५ हजार,नेहरू नगर झोन मधील हरीसन लॉन नंदनवन -२५ हजार,कोहीनूर लॉन १० हजार, लक्ष्मी धाबा खरबी-५ हजार,गांधीबाग झोनच्या पथकाने जैन भवन -१५ हजार, शहजादी लॉन -१० हजार,आशीनगर मधील विवश लॉन -२५ हजार, मंगळवारी झोनने-दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सदर ५ हजार,स्पेक्ट्रम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ५ हजार,अलकरीन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ५ हजार, फॅन्सी डिझाईन प्रा.लि. यांच्याकडून ५ हजार दंड वसूल करण्यात आला.

....

कारवाई नंतरही लग्न समारंभात गर्दी

कोविड संसगार्चा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून लग्न समारंभात फक्त ५० लोकांना परवानगी आहे. त्याहून अधिक वऱ्हाडी असल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे. असे असतानाही उपद्रव शोध पथकाने केलेल्या तपासणीत अनेक ठिकाणी २००हून अधिक नागरिक उपस्थित होते. मास्क न लावणे, सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्याचे निदर्शनास आल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली.

...........

झोननिहाय तपासणी

झोन मंगल कार्यालय

लक्ष्मीनगर १२

धरमपेठ ०८

हनुमाननगर ०८

धंतोली १०

नेहरूनगर १२

गांधीबाग ०७

सतरंजीपुरा ०४

लकडगंज १०

आसीनगर १६

मंगळवारी०५

Web Title: 92 Mars office, lawn inspection, 18 fined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.