फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्याच्या खात्यातून उडविले तब्बल ९.२२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 08:36 PM2022-03-07T20:36:01+5:302022-03-07T20:37:34+5:30

वर्क कॅपिटल फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या खात्यातून अज्ञात आरोपीने ९.२२ लाख रुपये उडविल्याची घटना सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत ५ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता घडली.

9.22 lakh was blown out of the account of an employee of a finance company | फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्याच्या खात्यातून उडविले तब्बल ९.२२ लाख

फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्याच्या खात्यातून उडविले तब्बल ९.२२ लाख

Next

नागपूर : वर्क कॅपिटल फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या खात्यातून अज्ञात आरोपीने ९.२२ लाख रुपये उडविल्याची घटना सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत ५ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता घडली आहे.

राजेश कृष्णगोपाल लखोटिया (४५, जीएस कॉलेजसमोर गोरेपेठ, अमरावती रोड) असे फिर्यादीचे नाव आहे. लखोटिया रामदास पेठच्या पुष्पकुंज अपार्टमेंट येथील वर्क कॅपिटल फायनान्स कंपनीत कार्यरत आहेत. ५ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता लखोटिया यांच्या बँक खात्यातून अज्ञात आरोपीने ९.२२ लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणूक व आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

...........

Web Title: 9.22 lakh was blown out of the account of an employee of a finance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.