वर्षभरात निर्यातीमध्ये ९९ टक्क्यांनी घट; नागपूर विभागातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 07:10 AM2021-08-31T07:10:00+5:302021-08-31T07:10:02+5:30

Nagpur News दळणवळणाच्या दृष्टीने नागपूर हे देशातील महत्त्वाचे स्थान मानण्यात येते. मात्र, वर्षभरात आयातीप्रमाणेच निर्यातीचे प्रमाणदेखील प्रचंड घटले आहे.

99% decline in exports during the year; Picture of Nagpur division | वर्षभरात निर्यातीमध्ये ९९ टक्क्यांनी घट; नागपूर विभागातील चित्र

वर्षभरात निर्यातीमध्ये ९९ टक्क्यांनी घट; नागपूर विभागातील चित्र

Next
ठळक मुद्देमहसुलाचा आकडा सव्वापाचशे कोटींनी घटला

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : दळणवळणाच्या दृष्टीने नागपूर हे देशातील महत्त्वाचे स्थान मानण्यात येते. मात्र, वर्षभरात आयातीप्रमाणेच निर्यातीचे प्रमाणदेखील प्रचंड घटले आहे. ‘कस्टम्स’च्या सहायक आयुक्त कार्यालयांतर्गत येणाऱ्या ‘आयसीडी’ अजनीतील (इनलॅन्ड कंटेनर डेपो) आकडेवारीनुसार २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये नागपूर विभागातील निर्यातीमध्ये ९९ टक्क्यांनी अधिक घट झाली. तर ‘आयसीडी’ला मिळणाऱ्या महसुलाचा आकडादेखील साडेपाचशे कोटींहून अधिकने घटला आहे. (99% decline in exports during the year; Picture of Nagpur division)

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘कस्टम्स’च्या सहायक आयुक्त कार्यालयाकडे विचारणा केली होती. २०१६-१७ पासून नागपूर विभागात किती कंटेनर्समधून आयात व निर्यात झाली, त्यातून किती महसूल प्राप्त झाला व एकूण किती निधीची आयात-निर्यात होती, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. ‘आयसीडी’ अजनीतर्फे प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१७-१८ मध्ये ४ हजार १९५ कोटी २४ लाख रुपयांच्या मालाची निर्यात झाली होती. त्यानंतर सातत्याने हा आकडा कमी होत गेला. २०१९-२० मध्ये निर्यात झालेल्या वस्तूंच्या किमतीचा आकडा हा ३ हजार ४१२ कोटी १९ लाख इतका होता. २०२०-२१ मध्ये यात प्रचंड घट झाली व केवळ ३६ कोटी ५३ लाखांच्या मालाची निर्यात झाली.

दुसरीकडे २०१९-२० मध्ये २ हजार ५३६ कोटी ४० लाखांच्या वस्तू आयात झाल्या होत्या. २०२०-२१ मध्ये हाच आकडा अवघा ३५ कोटी ४४ लाख इतका होता.

याशिवाय महसुलातदेखील मोठी घट झाली. २०१९-२० मध्ये जो महसूल ५३१ कोटी ३१ लाख इतका होता तो २०२०-२१ मध्ये ६ कोटी ९८ लाख इतक्यावर पोहोचला.

 

 

Web Title: 99% decline in exports during the year; Picture of Nagpur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.