‘गुगल पे’वरून ९९ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 10:22 AM2021-02-25T10:22:24+5:302021-02-25T10:22:47+5:30
Nagpur News ‘गुगल पे’वरून आरोपीने एका व्यक्तीच्या खात्यातून ९९ हजार ६५३ रुपये काढल्याची घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
ठळक मुद्देआरोपीने आपण कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘गुगल पे’वरून आरोपीने एका व्यक्तीच्या खात्यातून ९९ हजार ६५३ रुपये काढल्याची घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. वीरेंद्र अमरेंद्र मणी (४३, रा. निर्मल कॉलनी, नारा) यांनी ऑनलाइन रेल्वेचा पास बुक केला. हा पास बुक झाला नव्हता. आरोपीने आपण कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी केली. आरोपीने मणी यांना १० रुपयांचा रिचार्ज करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या खात्यातील ९९ हजार ६५३ रुपये गुगल पेच्या माध्यमातून पळविले. वीरेंद्र मणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
..........