विदर्भात तीन दिवसांत ९९९४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:10 AM2021-02-27T04:10:23+5:302021-02-27T04:10:23+5:30
नागपूर : विदर्भात तीन दिवसांत ९९९४ नव्या रुग्णांची भर पडली तर ७७ रुग्णांचे जीव गेले. सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच तीन दिवसांतील ...
नागपूर : विदर्भात तीन दिवसांत ९९९४ नव्या रुग्णांची भर पडली तर ७७ रुग्णांचे जीव गेले. सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच तीन दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. शुक्रवारी ११ जिल्हे मिळून ३१७३ रुग्ण पॉझिटिव्ह आले, व २० बळी गेले. नागपूर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या हजारावर गेली. १०७४ रुग्णांची नोंद झाली. ६ रुग्णांचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यात ७५४ रुग्ण व ८ मृत्यू झाले. नागपूर विभागात नागपूरनंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद वर्धा जिल्ह्यात झाली. १७५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अमरावती विभागात अमरावतीनंतर सर्वाधिक रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात आढळून आले. ३९१ रुग्णांची नोंद झाली. अकोल्यात २६८ तर यवतमाळमध्ये २४१ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
जिल्हा रुग्ण ए. रुग्ण मृत्यू
नागपूर १०७४ १४७९०५ ०६
भंडारा ४४ १३६१२ ०१
वर्धा १७५ १२०३२ ००
गोंदिया ११ १४४०० ००
गडचिरोली २४ ९५१४ ०१
चंद्रपूर ४५ २३५५८ ००
अमरावती ७५४ ३३५८५ ०८
अकोला २६८ १५३९२ ०१
यवतमाळ २४१ १७०९७ ०३
बुलडाणा ३९१ १७९७९ ००
वाशिम १४६ ८६२१ ००