मालवाहू वाहनाच्या धडकेत इसमाचा जागीच मृत्यू
By दयानंद पाईकराव | Updated: May 3, 2023 15:22 IST2023-05-03T15:22:28+5:302023-05-03T15:22:36+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ते नवेगाव वस्तीत कवडस कडून नवेगाव जाणाऱ्या रोडवर लघुशंकेला जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते.

मालवाहू वाहनाच्या धडकेत इसमाचा जागीच मृत्यू
नागपूर : मालवाहू वाहनाच्या धडकेत एका ३५ वर्षाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास कवडस ते नवेगाव रोडवर घडली. केवाकर हरिचंद मेश्राम (वय ३५, रा. चिखलधोकडा, हिवरा हिवरी ता. उमरेड, नागपूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ते नवेगाव वस्तीत कवडस कडून नवेगाव जाणाऱ्या रोडवर लघुशंकेला जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते. तेवढ्यात टाटा मालवाहू सहा चाकी वाहन क्रमांक एम. एच. ४०, एन-४२५४ चा चालक मुकेश यशवंत ईवनाते (वय ३२, रा. किन्नी धानोली, हिंगणा) याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून केवाकर यांना धडक देऊन गंभीर जखमी केले. यात जागीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी केवाकर यांचा पुतण्या ऋतिक सेवाकर मेश्राम (वय २२, रा. चिखलधोकडा) याने दिलेल्या तक्रारीवरून हिंगणाच्या उपनिरीक्षक अमृता सोमवंशी यांनी आरोपी टाटा मालवाहू वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.