'माझ्यासारखा भिकारी काहीच करू शकत नाही', राज्यपालांनी सांगितली इकॉनॉमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 03:42 PM2022-09-29T15:42:41+5:302022-09-29T15:46:31+5:30
जर आपण सर्वांनी निश्चिय केला, सहयोग, संपर्क आणि सेवा यी तिन्हीचा अवलंब केल्यास लवकरच ५ मिलियन्सची इकॉनॉमी भारत देश बनले.
नागपूर - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे नंतर त्या विधानावर स्पष्टीकरणही दिलं आहे. आता, नागपूर येथील सुरेश भट सभागृहात आयोजित भारत विकास परिषदेच्या संमेलनात आज त्यांनी उपस्थिती दर्शविली होती. येथील सभागृहाला संबोधित करताना राज्यपाल कोश्यारी यांनी देशाच्या इकॉनॉमीवर भाष्य केलं. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५ ट्रिलियन्स इकॉनॉमीचा विचारही सांगितला.
जर आपण सर्वांनी निश्चिय केला, सहयोग, संपर्क आणि सेवा यी तिन्हीचा अवलंब केल्यास लवकरच ५ मिलियन्सची इकॉनॉमी भारत देश बनले. पंतप्रधान नेहमी सांगतात की आपल्याला लवकरच ५ ट्रिलियन इकॉनॉमी व्हावी. पण, सहयोग, संपर्क आणि सेवा या तिन्हींना ग्रहण केल्यास, मला वाटते की पंतप्रधानांच्या विचार करण्याअगोदरच पाच ट्रिलियन इकॉनॉमी होउन जाईल. त्यामध्ये, माझ्यासारखा भिकारी काहीच करू शकत नाही, हे सगळं तुमच्यामुळेच शक्य आहे, असे ते
भारत विकास परिषदेमध्ये सौभाग्याने सगळे चांगले लोक आहेत. कुणी चांगला डॉक्टर आहे, कुणी चांगला वकील आहे, कोणी चांगला व्यापारी आहे, हे सगळे लोकं एकत्र येतात, विचार करतात आणि सेवा करतात. आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी हेच लोक विचार करतात, असेही कोश्यारी यांनी म्हटले. नितीन गडकरी हेही आपल्याला संबोधन करणार आहेत. गडकरी मला नेहमी म्हणतात की कोश्यारीजी तुम्ही मला ८ हजार रुपये द्या, मी तुम्हाला ८ लाख कोटी रुपयांची कामे करुन दाखवतो, हाच उत्कर्ष आहे, असे म्हणत कोश्यारी यांनी इकॉनॉमी समजून सांगण्याचा प्रयत्न भारत विकास परिषदेत केला.