हिवाळी अधिवेशनांच्या ऐतिहासिक वाटचालीला अधोरेखित करणाऱ्या ग्रंथाची होणार निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:26 IST2024-12-17T16:25:33+5:302024-12-17T16:26:42+5:30
Nagpur : उपसभापती डॉ. गोहे यांच्या अध्यक्षतेखाली संपादकांची बैठक

A book highlighting the historical journey of the Winter Sessions will be produced.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भ विकासासह अनेक सामाजिक प्रश्नांवर सभागृहात झालेल्या चर्चा ते लोकाभिमुख शासन निर्णयापर्यंतचा एक मैलाचा टप्पा नागपूर विधानभवनाने अनुभवला आहे. याचा आढावा घेणारा परिपूर्ण संदर्भ ग्रंथ साकारण्यात येणार आहे. नागपुरातील तिन्ही पिढ्यांचा सहभाग असलेले सशक्त संपादक मंडळ या ग्रंथाची दिलेल्या मुदतीत अभ्यासपूर्ण निर्मिती करेल असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी व्यक्त केला.
सोमवारी विधानभवनात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे वृत्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार व संपादक यांची बैठक उपसभापती डॉ. गोन्हे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 'नागपूर येथील हिवाळी अधिवेशने- विधानपरिषदेतील ऐतिहासिक पाऊलखुणा' या ग्रंथाच्या परिपूर्ण निर्मितीसाठी संपादकीय मंडळ निश्चित करण्यात आले. माजी संपादक सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखालील या संपादकीय मंडळामध्ये नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, लोकमतचे संपादक श्रीमंत माने, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव, पुण्यनगरीचे संपादक रमेश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे, भूपेंद्र गणवीर, आनंद निर्वाण, शैलेश पांडे, महेश उपदेव, मनीष सोनी, विकास वैद्य आणि नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे, समन्वय संपादक नीलेश मदाने यांचा समावेश आहे.
विधानभवनातील राष्ट्रकुल समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस उपरोक्त संपादकीय मंडळासह विधानभवनचे सचिव २ कार्यभार) विलास आठवले, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नीलेश मदाने, नागपूर विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे उपस्थित होते.