खळबळजनक! चक्क रस्त्यावर नग्नावस्थेत उतरले जोडपे; नागपुरातील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 23:29 IST2024-07-28T23:29:08+5:302024-07-28T23:29:29+5:30
लक्ष्मीनगर चौकाजवळील प्रकार.

खळबळजनक! चक्क रस्त्यावर नग्नावस्थेत उतरले जोडपे; नागपुरातील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ
योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत कार व मोटारसायकल चालविताना अश्लील चाळे करण्याचे प्रकार करणाऱ्या दाम्पत्यांचे प्रताप समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, आता तर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात चक्क कारमधील एक जोडपे नग्नावस्थेत रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहे. संबंधित व्हायरल व्हिडीओ नागपुरातील लक्ष्मीनगर चौकाजवळील आहे.
नागपुरातील काही दुचाकीस्वार तरुणांनी हा व्हिडीओ काढला आहे. शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास लक्ष्मीनगर चौकाकडून श्रद्धानंदपेठ चौकाकडे चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर एका कारमधून एक तरुण भांडण करत खाली उतरला. त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. काही वेळातच नग्नावस्थेत एक महिलादेखील खाली उतरली व त्या तरुणाची माफी मागत होती. त्यानंतर तरुण फुटपाथच्या शेजारी असलेल्या एका मोडक्या घराकडे निघाला. त्यावेळी रस्त्यावर तुरळक वर्दळ होती व दोन दुचाकीस्वारांनी याचा व्हिडीओ बनविला.
सोशल माध्यमांवर हा व्हिडीओ चांगलाच प्रसारित झाला. याबाबत बजाजनगर पोलिस ठाण्यात कुठलीही तक्रार किंवा गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. पोलिसांनी व्हिडीओवरून दोघांचा शोध लावला व त्यांना पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यांची मानसिक अवस्था ठीक नसल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला. पांढरपेशा समजल्या जाणाऱ्या भागात असा प्रकार होत असेल तर तो निश्चितपणे गंभीर असल्याची प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून व्यक्त होत आहे.