चिलम पिताना झाला वाद, अल्पवयीन मुलाने मित्रावर केले चाकूनेच वार
By योगेश पांडे | Published: January 23, 2024 05:52 PM2024-01-23T17:52:50+5:302024-01-23T17:53:27+5:30
नागपुरात अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक झाली आहे.
योगेश पांडे,नागपूर : नागपुरात अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक झाली आहे. सक्करदरा तलावाजवळ चिलम पिताना वाद झाल्याने एका अल्पवयीन मुलाने त्याच्याच मित्रावरच चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सोमवारी रात्री ही घटना घडली. गणेश उर्फ गणू मलकू आत्राम (१८, गोंड कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. तो त्याच्या १७ वर्षीय मित्रासोबत बसला होता व चिलम पिण्याच्या मुद्द्यावरून दोघांचा वाद झाला. अल्पवयीन आरोपीने संतापात शिवीगाळ केली व गणेशवर चाकूने वार केले. यात गणेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले. पोलिसांनी गौरी आत्राम यांच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.