गांजाची तस्करी करणारा ओडिशामधून आला अन् ... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2023 09:15 PM2023-06-26T21:15:45+5:302023-06-26T21:16:07+5:30

Nagpur News ओडिशामधून तो रेल्वेत बसला आणि नागपुरात पोहचला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी निर्जन ठिकाणी रेल्वे गाडीची गती कमी होताच तो खाली उतरून पळू लागला. त्याची हीच कृती संशयास्पद ठरली आणि तो रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांच्या हाती लागला.

A ganja smuggler came from Odisha and... | गांजाची तस्करी करणारा ओडिशामधून आला अन् ... 

गांजाची तस्करी करणारा ओडिशामधून आला अन् ... 

googlenewsNext


नागपूर : ओडिशामधून तो रेल्वेत बसला आणि नागपुरात पोहचला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी निर्जन ठिकाणी रेल्वे गाडीची गती कमी होताच तो खाली उतरून पळू लागला. त्याची हीच कृती संशयास्पद ठरली आणि तो रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांच्या हाती लागला. प्राथमिक चाैकशीत तो गांजा तस्कर असल्याचे स्पष्ट झाले. तुषार चंद्रशेखर सावरकर असे त्याचे नाव असून तो झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी आहे.


तुषार गांजा तस्करीत आणि विक्रीत सक्रिय आहे. आरपीएफ सूत्रांच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी त्याने ओडिशामधील कांताबाजी येथून नागपूरचे रेल्वेचे जनरल तिकिट घेतले आणि गांधीधाम एक्सप्रेसमध्ये बसला. ही गाडी सोमवारी नागपुरात दाखल झाली. मोमिनपुरा भागाजवळ सिग्नल क्लियर नसल्याने गाडीचा वेग कमी झाली. रेल्वेस्थानकावर गेल्यास पकडले जाण्याचा धोका असल्याची शंका असल्याने तुषार चालत्या गाडीतून खाली उतरला आणि लगबगीने फलाटाच्या पलिकडे जाऊ लागला. त्याची ही कृती संशयास्पद वाटल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी त्याच्याकडे धाव घेऊन त्याला पकडले. विचारपूस करतानाच त्याच्या जवळची बॅग तपासली असता त्यात २ किलो गांजा आढळला. त्याने तो ओडिशामधून आणल्याची कबुली दिली. दरम्यान, आज सोमवारी सकाळी आरपीएफने तुषारला रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. पुढील चाैकशी सुरू आहे.

कारवाईबाबतची गोपनियता संशयास्पद
आरपीएफच्या अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार तुषारला रविवारी सकाळी पकडण्यात आले. तो एकटाच होता आणि त्याच्याकडे दोनच किलो गांजा होता तर मग पकडल्यानंतर चार-सहा तासांच्या चाैकशीनंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या हवाली का केले नाही. आरोपीला रेल्वे पोलिसांना सोपविण्यासाठी सोमवारची सकाळ का उजाडली, असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, थोड्या-थोडक्या कारवाईची माहिती लगेच सोशल मिडिया ग्रुपवर टाकणाऱ्या आरपीएफने या कारवाईची माहिती सोमवारी रात्रीपर्यंत का दिली नाही, असाही प्रश्न आहे.

Web Title: A ganja smuggler came from Odisha and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.