भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

By आनंद डेकाटे | Published: May 25, 2024 05:02 PM2024-05-25T17:02:39+5:302024-05-25T17:03:47+5:30

Nagpur : भारतीय सेनेच्या तिन्ही दलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पूर्व प्रशिक्षण केंद्र घेणार मुलाखत

A Golden Opportunity for Pre-Officer Training in Indian Armed Forces | भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

A Golden Opportunity for Pre-Officer Training in Indian Armed Forces

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
भारतीय सेनेच्या तिन्ही दलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सीडीएस- ६३ या परीक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी १० जून ते २३ ऑगस्ट या कालावधीत सीडीएस- ६३ कोर्स आयोजित करण्यात येत आहे. सीडीएस कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नागपूर, येथे २८ में रोजी मुलाखतीस हजर राहावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी: training.petenashik@gmail.com असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नागपूर यांनी केले आहे.

Web Title: A Golden Opportunity for Pre-Officer Training in Indian Armed Forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.