अबूधाबीनंतर बहरीनमध्ये हिंदू मंदिर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 07:57 PM2022-02-09T19:57:30+5:302022-02-09T19:59:13+5:30

Nagpur News मध्य पूर्वेतील बहरीन येथे बीएपीएस स्वामीनारायण संस्थेद्वारे पारंपरिक हिंदू मंदिर उभारण्यात येणार असून, त्या भागातील हा असा दुसरा देश बनणार आहे.

A Hindu temple will be built in Bahrain after Abu Dhabi | अबूधाबीनंतर बहरीनमध्ये हिंदू मंदिर उभारणार

अबूधाबीनंतर बहरीनमध्ये हिंदू मंदिर उभारणार

googlenewsNext
ठळक मुद्देबीएपीएस स्वामीनारायण संस्थेचा पुढाकारमध्य पूर्वेकडील देशांमधील दुसरे मंदिर राहणार

नागपूर : मध्य पूर्वेतील बहरीन येथे बीएपीएस स्वामीनारायण संस्थेद्वारे पारंपरिक हिंदू मंदिर उभारण्यात येणार असून, त्या भागातील हा असा दुसरा देश बनणार आहे. बहरीनचे पंतप्रधान प्रिन्स सलमान बिन हमाद अल खलिफा यांच्याशी चर्चा केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.

‘बहरीनचे पंतप्रधान प्रिन्स सलमान बिन हमाद अल खलिफा यांच्याशी दिलखुलासपणे चर्चा झाली. स्वामीनारायण मंदिरासाठी जमीन वाटप करण्याच्या निर्णयासह भारतीय समुदायाच्या गरजांकडे लक्ष दिल्याबद्दल त्यांचे आभार, अशी भावना मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून मांडली.

अबूधाबी येथील बीएपीएस हिंदू मंदिराच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे ब्रह्मविहारीदास स्वामी यांनी गेल्या काही वर्षांत बहरीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा आणि प्रिन्स सलमान यांची अनेकदा भेट घेतली. अबूधाबी येथील बीएपीएस हिंदू मंदिराचे अध्यक्ष अशोक कोटेचा यांनी या ऐतिहासिक निर्णयाबाबत बहरीन व भारत या दोन्ही देशांच्या नेतृत्वाचे आभार मानले.

बीएपीएस स्वामीनारायण हिंदू मंदिरासाठी जमीन देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आम्ही दोन्ही देशांच्या नेत्यांचे आभार मानतो. बीएपीएस स्वामीनारायण संस्था अबूधाबीप्रमाणे बहरीनमध्येदेखील जागतिक सुसंवादासाठी आध्यात्मिक मंच प्रदान करेल. आम्ही बहरीनमध्ये एकात्मता, शांतता व सेवेचे स्थान निर्माण करण्यासाठी एकत्रितरीत्या काम करण्यास उत्सुक आहोत, असे मत कोटेचा यांनी व्यक्त केले.

अबूधाबीतील मंदिर पुढील वर्षी पूर्ण होणार

संयुक्त अरब आमिरातमधील पहिल्या पारंपरिक दगडी मंदिराचे बांधकाम अबूधाबी येथे सुरू असून, पुढील वर्षी ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या मंदिरात मंदिरात हाताने कोरलेले गुलाबी सॅंडस्टोन वापरण्यात आले असून, ते भारताची समृद्ध संस्कृती आणि इतिहास प्रतिबिंबित करतात. मंदिरात सात मनोरे व कळस आहेत. मंदिर किमान हजार वर्षे टिकेल अशा दर्जाचे हे बांधकाम आहे. मंदिराच्या संकुलात अभ्यागत केंद्र, प्रार्थना सभागृह, वाचनालय, वर्गखोली, कम्युनिटी सेंटर, मजलिस, ॲम्फिथिएटर, खेळाचे क्षेत्र, उद्याने, पुस्तके आणि भेटवस्तूंची दुकाने, फूड कोर्ट आणि इतर सुविधा असतील, अशी माहिती कोटेचा यांनी दिली. अबू मुरेखा येथील मंदिराच्या ठिकाणी विटा स्थापन करण्यासाठी समाजातील सदस्यांचे स्वागत आहे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

Web Title: A Hindu temple will be built in Bahrain after Abu Dhabi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर