खरबीत टळला आगीचा मोठा धोका, गाडीला आग लागून अपार्टमेंटचे मीटर जळाले
By मंगेश व्यवहारे | Updated: June 22, 2024 15:38 IST2024-06-22T15:37:52+5:302024-06-22T15:38:04+5:30
खरबी भागातील शक्तीमातानगर येथील सिद्धांत एनक्लेव्हमध्ये पहाटे ३ वाजताच्या सुमारास पार्किंगमध्ये असलेल्या गाडीला आग लागली

खरबीत टळला आगीचा मोठा धोका, गाडीला आग लागून अपार्टमेंटचे मीटर जळाले
नागपूर : खरबी भागातील शक्तीमातानगर येथील सिद्धांत एनक्लेव्हमध्ये पहाटे ३ वाजताच्या सुमारास पार्किंगमध्ये असलेल्या गाडीला आग लागली. या आगीत अपार्टमेंटमधील रहिवाश्यांचे वीजेचे मीटर जळाला. आगीची घटना लवकर लक्षात आल्याने, अग्निशमन विभागाला संपर्क करण्यात आला. लकडगंजचे अग्निशमन पथक घटनास्थळी पोहचल्याने आगीचा मोठा धोका टळला. या आगीत अपार्टमेंट मधील ७ मीटर व दोन दुचाकी जळाल्या.
आगीत १ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात केली आहे. आगीची दुसरी घटना फारुकनगर औलिया मस्जीदजवळ घडली. येथील शाहीद अन्सारी यांच्या घराला आग लागली होती. सुगतनगर अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. आगीमध्ये घरातील इलेक्ट्रीकचे साहित्य व आलमारी, सोफा व कपडे जळाले. अग्निशमन पथकाने ५० हजार रुपये नुकसानीचा अंदाज व्यक्त केला आहे.