अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटो,व्हिडीओ केले व्हायरल
By योगेश पांडे | Updated: August 12, 2024 17:48 IST2024-08-12T17:47:33+5:302024-08-12T17:48:17+5:30
Nagpur : आरोपीविरोधात पोक्सो ॲक्ट तसेच आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

A minor girl was tortured and the photos and videos went viral
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून महाविद्यालयीन विद्यार्थी यात आरोपी आहे.
साहील सिद्धार्थ नितनवरे (१९, डिफेन्स कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये त्याची एका १७ वर्षीय मुलीशी ओळखी झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तो तिला निर्जन स्थळी घेऊन गेला. तेथे धमकी देत त्याने तिच्यावर अत्याचार केला होता. त्यावेळी त्याने फोटो व व्हिडीओ काढले होते. त्यानंतर ते फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. अनेकदा त्याने तिला मारहाणदेखील केली. तिच्या संयमाचा बांध तुटल्यानंतर तिने पालकांना या प्रकाराची माहिती दिली. तिच्या आईवडीलांनी त्याला जाब विचारला असता त्यांनादेखील त्याने धमकी दिली होती. त्यानंतर त्याने तिच्या नातेवाईकांना अश्लिल फोटो व व्हिडीओ पोस्ट केले. हा प्रकार समोर आल्यावर मुलीने वाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी साहीलविरोधात पोक्सो ॲक्ट तसेच आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे.