अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2023 10:17 PM2023-01-24T22:17:43+5:302023-01-24T22:18:13+5:30
Nagpur News शाळा सुटल्यानंतर सावनेर शहरातील अल्पवयीन विद्यार्थिनीला घरी साेडून देण्याच्या बहाण्याने दाेघांनी कारमध्ये बसविले आणि खापा-काेदेगाव मार्गावर नेऊन तिच्यावर दाेघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केला.
नागपूर : शाळा सुटल्यानंतर सावनेर शहरातील अल्पवयीन विद्यार्थिनीला घरी साेडून देण्याच्या बहाण्याने दाेघांनी कारमध्ये बसविले आणि खापा-काेदेगाव मार्गावर नेऊन तिच्यावर दाेघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केला. ही घटना साेमवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली असून, यातील दाेन्ही आराेपीस अटक करण्यात आली आहे.
अखिल ऊर्फ अक्की महादेव भोंग (२६, रा. पंधराखेडी, सावनेर) आणि पवन विठ्ठल भासकवरे (२४, रा. मानेगाव, ता. सावनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. पीडित विद्यार्थिनी सावनेर शहरात राहत असून, ती शहरातील नगर परिषद हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकते. साेमवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर ती पायी घराच्या दिशेने जात हाेती. त्यातच दाेघेही एमएच-३१ / डीव्ही-४८९४ क्रमांकाच्या कारने शाळेजवळ आले.
दाेघांनीही तिला कारने घरी साेडून देण्याची बतावणी केली. दाेघेही थाेडेफार ओळखीचे असल्याने ती कारमध्ये बसली. त्यांनी कार तिच्या घराच्या दिशेने न नेता वेगात सावनेर-खापा मार्गावरून खापा-काेदेगाव मार्गावर नेली. या मार्गावरील उड्डाण पुलावरून खाली जाणाऱ्या राेडलगत कार उभी करून दाेघांनी तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. घर गाठताच तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने तिला धीर देत मंगळवारी (दि.२४) पाेलिस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि ३६३, ३७६ (२) (जे), ३७६ (५), ३२३, ५०६, ३४, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ कलम ४, ६ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य विचारात घेत सहायक पाेलिस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी दाेन्ही आराेपींना हुडकून काढत मंगळवारी अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलिस निरीक्षक साेनाली रासकर करीत आहेत.
दाेन महिन्यांपूर्वी ओळख
तिच्या मैत्रिणीने दाेन महिन्यांपूर्वी तिची त्या दाेघांशी ओळख करून दिली हाेती. त्यामुळे ती त्यांच्या कारमध्ये बसायला तयार झाली. कार वेगळ्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच तिने प्रतिकार केला. मात्र, उपयाेग झाला नाही. लैंगिक अत्याचार केल्यानंतर या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्या दाेघांनी तिला दिली. सहायक पाेलिस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शाेध घेत त्या दाेघांना हुडकून काढले.