भावनांवर विजय मिळविणारी व्यक्ती म्हणजे योगी; प्रबोधनकार जया किशोरी यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 12:08 PM2022-10-10T12:08:54+5:302022-10-10T12:10:24+5:30

योगी होण्यासाठी स्वत:च्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण करणे व नेहमी चांगले कर्म करणे आवश्यक

A person who conquers emotions is a Yogi, preacher Jaya Kishori's opinion | भावनांवर विजय मिळविणारी व्यक्ती म्हणजे योगी; प्रबोधनकार जया किशोरी यांचे मत

भावनांवर विजय मिळविणारी व्यक्ती म्हणजे योगी; प्रबोधनकार जया किशोरी यांचे मत

Next

नागपूर : भावना, कर्म व इच्छा या तीन बाबींवर विजय मिळविणारी व्यक्ती म्हणजे योगी होय, असे मत आध्यात्मिक प्रबोधनकार व कथावाचक जया किशोरी यांनी रविवारी योगिराज कृष्ण विषयावरील व्याख्यानात बोलताना व्यक्त केले.

शंकर मुरारका व दिलीप अग्रवाल यांच्यावतीने रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. योगी स्वत:मध्ये अंतरबाह्य बदल करतो. त्याला प्रत्येक विषयाचे ज्ञान असते. तो भावना, कर्म व इच्छांच्या जाळ्यात अडकत नाही. योगी होण्यासाठी वनात जाण्याची किंवा कडक तपश्चर्या करण्याची गरज नाही. समाजात राहूनही योगी होता येते. योगी होण्यासाठी स्वत:च्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण करणे व नेहमी चांगले कर्म करणे आवश्यक आहे. भगवान कृष्ण सर्वात मोठे योगी होते. त्यामुळे त्यांनी जीवनातील प्रत्येक भूमिका उत्कृष्टपणे पूर्ण केली. त्यांनी प्रत्येक रुपात यश मिळविले, असेही जया किशोरी यांनी सांगितले.

Web Title: A person who conquers emotions is a Yogi, preacher Jaya Kishori's opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.