राज्यातील १२ जातींचा ओबीसीत समावेश करण्याचा केंद्राकडे प्रस्ताव, हंसराज अहीर यांची माहिती

By कमलेश वानखेडे | Published: October 7, 2023 03:20 PM2023-10-07T15:20:48+5:302023-10-07T15:21:37+5:30

: १६ तारखेला सुनावणी 

A proposal to the Center to include 12 castes in the state under OBC, informed by Hansraj Ahir | राज्यातील १२ जातींचा ओबीसीत समावेश करण्याचा केंद्राकडे प्रस्ताव, हंसराज अहीर यांची माहिती

राज्यातील १२ जातींचा ओबीसीत समावेश करण्याचा केंद्राकडे प्रस्ताव, हंसराज अहीर यांची माहिती

googlenewsNext

नागपूर : महाराष्ट्रातील १२ जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. या १२ जाती ओबीसी म्हणून महाराष्ट्राच्या सुचीत आहे. पण केंद्राच्या सुचीत समावेश करण्यासाठी राज्य सरकारने या १२ जातींची यादी पाठवली आहे. यावर १६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी शनिवारी नागपुरात दिली.

अहीर म्हणाले, मराठा समाजाचा प्रश्न राज्य सरकारच्या टेबलवर आहे. त्या कामाला राज्य सरकार लागले आहे. लिंगायत, लेखी, भोयर, पवार अशा १२ जाती आहे. ओबीसांच्या केंद्रीय सुचीत समावेश करण्याबाबत १६-१७ तारखेला सुनावणी होईल. बिहारमध्ये ६३ टक्के ओबीसी असल्याचे सिद्ध झाले आहे. यातील मागास जातींना पुढे अणण्यासाठी मोदी सरकारचे मोठे प्रयत्न आहेत. पश्चिम बंगाल सरकारने ८७ जातींचा ओबीसी केंद्रीय सुचीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पाठवला. त्यात ७७ अल्पसंख्यांकांच्या जाती आहे. आपण ती यादी थांबवली. कर्नाटक, पश्चिम बंगालमध्ये ओबीसींच्या हक्कावर अतिक्रमण. यांच्यासाठी ओबीसी धर्मशाळा झाली आहे, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

चंद्रपूर लोकसभेसाठी अहीर इच्छूक

- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे संकेत हंसराज अहीर यांनी दिले. ते म्हणाले, चंद्रपूर मतदारसंघातील लोकांना माझा चेहरा ओळखीचा आहे. मी पक्षाच्या बांधणीसाठी मतदारसंघात फिरत आहे. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मी मेहनत करतोय. २०१९ ची निवडणुक हारलो. मी निराश झालो नाही. पुढील निवडणूक जिंकण्यासाठी हरलो, असा सांगत त्यांनी आपला इरादा पक्का असल्याचे संकेत दिले.

Web Title: A proposal to the Center to include 12 castes in the state under OBC, informed by Hansraj Ahir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.