शहीद चौकातील रेडिमेड गार्मेंट्सचे दुकान फोडले, पाच लाखांसोबत पॅंटपीसदेखील चोरले

By योगेश पांडे | Published: October 27, 2023 06:04 PM2023-10-27T18:04:38+5:302023-10-27T18:07:49+5:30

४० हजारांचे जिन्सचे पॅंटपीस घेऊन गेले चोर

A ready-made garment shop in Shaheed Chowk was broken into, pant pieces were also stolen along with five lakhs | शहीद चौकातील रेडिमेड गार्मेंट्सचे दुकान फोडले, पाच लाखांसोबत पॅंटपीसदेखील चोरले

शहीद चौकातील रेडिमेड गार्मेंट्सचे दुकान फोडले, पाच लाखांसोबत पॅंटपीसदेखील चोरले

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: अज्ञात चोरट्यांनी शहीद चौकातील रेडिमेड गार्मेंट्सचे दुकान फोडले व पाच लाख रुपये रोख चोरून नेले. आश्चर्याची बाब म्हणजे दिवाळीच्या तोंडावर चोरटे सुमारे ४० हजारांचे जिन्सचे पॅंटपीसदेखील घेऊन गेले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

शहीद चौकातील उदय रेमंड शोरूममध्ये हा प्रकार घडला. उदय शांतीकुमार जैन (६२, लाडपुरा, इतवारी) यांचे ते दुकान आहे. दसऱ्याच्या दिवशी दुकान बंद करून सगळे घरी गेले. मध्यरात्रीनंतर एक वाजताच्या सुमारास अज्ञात चोरटे तेथे आले व दुकानाच्या गच्चीवरील लिफ्ट मशीनवरील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी रोख पाच लाख रुपये व रेडिमेड जिन्स पॅंट मटेरिअल चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यावर जैन यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: A ready-made garment shop in Shaheed Chowk was broken into, pant pieces were also stolen along with five lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.