धावत्या शिवशाही बसने घेतला पेट; १६ प्रवाशांसह चालक, वाहक सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 06:29 PM2023-04-04T18:29:50+5:302023-04-04T18:30:18+5:30

Nagpur News नागपूरहून १६ प्रवासी घेऊन अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या नागपूर (गणेशपेठ) आगाराच्या शिवशाही बसने मध्येच पेट घेतला. सर्वजण समयसूचकता बाळगत वेळीच बसच्या बाहेर पडल्याने कुणालाही इजा झाली नाही.

A running Shivshahi bus caught fire; 16 passengers along with driver, carrier safe | धावत्या शिवशाही बसने घेतला पेट; १६ प्रवाशांसह चालक, वाहक सुखरूप

धावत्या शिवशाही बसने घेतला पेट; १६ प्रवाशांसह चालक, वाहक सुखरूप

googlenewsNext

नागपूर : नागपूरहून १६ प्रवासी घेऊन अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या नागपूर (गणेशपेठ) आगाराच्याशिवशाही बसने मध्येच पेट घेतला. सर्वजण समयसूचकता बाळगत वेळीच बसच्या बाहेर पडल्याने कुणालाही इजा झाली नाही. मात्र, अनेकांच्या बॅगा व त्यातील साहित्य बससाेबत पूर्णपणे जळाले. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चमेली शिवारात मंगळवारी (दि. ४) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली असून, आगीचे कारण कळू शकले नाही.

गणेशपेठ (नागपूर) आगाराची एमएच-०६/बीडब्ल्यू-०७८८ क्रमांकाची शिवशाही बस १६ प्रवासी घेऊन नागपूरहून अमरावतीच्या दिशेने जात असताना चमेली शिवारात बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे बसचालक अब्दुल जहीर (वय ४३, रा. कामठी) यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बस साई मंदिराजवळ राेडच्या बाजूला उभी केली आणि वाहक उज्ज्वला देशपांडे (४०, रा. नागपूर) यांनी प्रवाशांना तातडीने खाली उतरण्याची सूचना केली. बस थाेडीफार जळत असताना बसमधील सर्व प्रवासी खाली उतरून दूरवर गेले. त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही.

दरम्यान, गणपतराव घाेटे, रा. काेंढाळी यांनी या घटनेची माहिती काॅंग्रेस नेत्या सुनीता गावंडे यांना देत पाेलिसांना सूचना दिली. सुनीता गावंडे यांनी प्रवाशांना मदतीचा हात दिला. पाेलिसांच्या सूचनेनुसार सोलार एक्सप्लोसिव्ह, इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह व काटोल नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या प्रत्येकी एक अशा ती गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे कारण कळू शकले नाही. बस चढावर असताना आग लागल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचे चालक अब्दुल जहीर यांनी सांगितले. आग नियंत्रणात येईपर्यंत बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला हाेता.

दागिन्यांसह राेख व साहित्य जळाले

या बसमध्ये कोंढाळीचे दाेन, तळेगावचे पाच आणि अमरावतीने नऊ असे एकूण १६ प्रवासी हाेते. पेटत्या बसमधून खाली उतरताना अनेकांना त्यांच्या बॅगा काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे बॅंगेतील साेन्या-चांदीचे दागिने, राेख रक्कम व इतर साहित्य पूर्णपणे जळाले. आगीत आपले साेन्याचे मंगळसूत्र जळाल्याची माहिती पद्मा वाकोडे (वय ६३, रा. अजनी चौक, नागपूर) यांनी दिली.

...

Web Title: A running Shivshahi bus caught fire; 16 passengers along with driver, carrier safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.