प्रतिभावान महिलांच्या कर्तृत्वाला सलाम; विदर्भस्तरीय ‘लोकमत’ ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारांचे थाटात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2023 09:18 PM2023-03-25T21:18:51+5:302023-03-25T21:20:30+5:30

Nagpur News महिलांच्या सर्वांगीण विकासातच समाजाची प्रगती असल्याच्या विचारातून सर्वांनी मार्गक्रमण करायला हवे, या विचारातून सातत्याने कार्यरत असलेल्या ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे विदर्भातील कर्तृत्ववान महिलांचा विदर्भस्तरीय ‘लोकमत’ ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.

A salute to the achievements of talented women; Grand distribution of Vidarbha level 'Lokmat' Jyotsna Sakhi Samman Awards | प्रतिभावान महिलांच्या कर्तृत्वाला सलाम; विदर्भस्तरीय ‘लोकमत’ ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारांचे थाटात वितरण

प्रतिभावान महिलांच्या कर्तृत्वाला सलाम; विदर्भस्तरीय ‘लोकमत’ ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारांचे थाटात वितरण

googlenewsNext

नागपूर : महिलांच्या सर्वांगीण विकासातच समाजाची प्रगती असल्याच्या विचारातून सर्वांनी मार्गक्रमण करायला हवे, या विचारातून सातत्याने कार्यरत असलेल्या ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे विदर्भातील कर्तृत्ववान महिलांचा विदर्भस्तरीय ‘लोकमत’ ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. रामदास पेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे शनिवारी आयोजित या कार्यक्रमादरम्यान हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे, नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुनीता गावंडे, ‘जीएसटी’च्या सहआयुक्त निधी चौधरी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. श्रुती तांबे, इंट्रियाच्या संचालक आणि सुप्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण थाटात पार पडले. भारतीय जीवन बीमा निगम प्रायोजित या कार्यक्रमाला निर्मिक ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्थेच्या जया अंभोरे व माजी नगरसेविका डॉ. परिणिता फुके यादेखील उपस्थित होत्या.

-हा सन्मान आदराचा

मालविकाने जागतिक क्रीडा विश्वात नागपूरचा झेंडा रोवला आहे. तिचा नेत्रदीपक प्रवास इतरांना प्रोत्साहन देणारा आहे. त्यात ‘लोकमत’ने केलेला तिच्या कर्तृत्वाचा सन्मान बळ देणारा आहे. हा सन्मान माझ्या मुलीसाठी आदराचा आहे.

-डॉ. तृप्ती बनसोड (मालविका बनसोड हिची आई), नागपूर

महिलांच्या गुणांचा सन्मान

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘ज्योत्स्ना सखी सन्मान पुरस्कार वितरण’ हा केवळ एक कार्यक्रम नाही तर महिलांच्या गुणांचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे. हा पुरस्कार स्वीकारताना मला अभिमान वाटतो.

-डॉ. वर्षा गंगणे, गोंदिया

 

-हा सन्मान तिच्या कार्याचा

दुर्गम भागातील रुग्णांच्या सेवेचा वसा घेतलेल्या माझ्या बहिणीचे कार्य पाहून अभिमान वाटतो. पतीच्या खांद्याला खांदा लावून तिची समाजसेवा महिलांसाठी प्रेरणादायी आहे. हा सन्मान तिचा आणि तिच्या समाजकार्याचा आहे. डॉ. कविताच्या हातून समाजसेवा घडत राहो, हीच सदिच्छा.

-डॉ. अंजली कोल्हे (‘महान’ संस्थेच्या सहसंस्थापिका डॉ. कविता सातव यांच्या बहीण), अमरावती

 

-पुढील कार्यासाठी बळ देणारा पुरस्कार

किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्यांसाठी काम करीत असताना ‘लोकमत’ने दिलेला हा पुरस्कार बळ देणारा आहे. या पुरस्काराने दुर्लक्षित असलेला परंतु महत्त्वाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. हा पुरस्कार माझ्यासारख्या अनेक महिलांसाठी ऊर्जा देणारा आहे.

-डॉ. मंजुश्री जांभरूणकर, ‘कळी उमलताना’ जागृतीकार्य, वाशिम

 

-इच्छा, आकांक्षांना वृद्धिंगत करणारा

‘लोकमत’ने दिलेला हा सन्मान इच्छा, आकांक्षांना वृद्धिंगत करणारा आहे. या पुरस्काराने राज्यस्तरावर पोहोचले. मोठा बहुमानाच मिळवून दिला आहे. मी ‘लोकमत’ची आभारी आहे. हा पुरस्कार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.

-माधुरीताई मडावी, मुख्याधिकारी यवतमाळ

 

-हा सन्मान सर्व शेतकऱ्यांना गर्व वाटावा असा

माझ्यासारख्या छोट्या शेतकरी महिलेचा केलेला हा सन्मान सर्व शेतकऱ्यांना गर्व वाटावा असाच आहे. माझ्या कार्याची दखल ‘लोकमत’ घेईल आणि मला पुरस्कृत करेल, असा विचारही केला नव्हता. हीच माझ्या कार्याची पावती आहे, असे मी मानते.

-वर्षा लांजेवार, चंद्रपूर

 

या पुरस्काराने ऊर्जा द्विगुणित झाली

‘लोकमत’ने दिलेल्या या पुरस्काराने माझी ऊर्जा द्विगुणित झाली. हा पुरस्कार आयुष्यातील एक अविस्मरणीय पुरस्कार आहे. मला मिळालेल्या या सन्मानाचा अतिशय आनंद आहे.

-शिल्पा अग्रवाल, मॅनेजिंग डायरेक्टर

व सीईओ आकाश फर्निचर ग्रुप, नागपूर

 

कृषी संशाेधनाला प्राधान्य दिल्याबद्दल आभार

इतर क्षेत्रातील संशाेधनाला मर्यादा असतात पण कृषी संशाेधन प्रयाेगशाळेत थेट शेत व शेतकऱ्यांपर्यंत जाणारे असते. त्यामुळे संशाेधनात पुरस्काराचा विचार करताना कृषी संशाेधनाला प्राधान्य दिल्याबद्दल लाेकमतचे आभार. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. शरद गडाख व संशाेधन संचालक डाॅ. विलास खर्चे यांच्या सर्वसमावेशक प्राेत्साहनामुळे विद्यापीठात संशाेधनाला चालना मिळत आहे. त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचेही आभार.

- डाॅ. आम्रपाली आखरे, संशाेधन उपसंचालक, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकाेला

 

भविष्याच्या वाटचालीसाठी ऊर्जा मिळेल

महिलांच्या कर्तृत्वाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महान कार्य लाेकमतकडून केले जात आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे भविष्यात प्रगतीची वाटचाल करण्यासाठी पुरस्काराची ऊर्जा मिळेल. लाेकमतच्या प्राेत्साहनाने अशा अनेक महिलांना प्रगतीच्या वाटेवर पाेहचविले आहे आणि पुढेही हे कार्य हाेतच राहील. लाेकमतचे खराेखर आभार.

- कमलताई भाेंडे, उपाध्यक्ष, संस्कार भारती विदर्भ, अमरावती

हा पुरस्कार सर्वांना समर्पित

पुरस्कारासाठी कधीच काम करीत नाही. कार्य करताना कधी पुरस्काराचा विचारही केला नाही. मात्र लाेकमतची टीम अशा कार्यकर्त्यांना शाेधून काढते आणि सन्मानित करते. त्यामुळे माझी दखल घेतल्याबद्दल लाेकमतचे आभार. पती, आईवडील, संस्थेच्या महिला कार्यकर्ता व देणगीदार यांच्या पाठबळाने हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करते.

- प्राजक्ता पेठे-पातुर्डे, संचालिका, बालउदय अनाथालय, भंडारा

 

वन, पर्यावरण राखण्यासाठी चांगले काम करण्याची प्रेरणा

पुरस्कारासाठी निवड झाल्याचे ऐकल्यानंतर आश्चर्य वाटत हाेते पण आज पुरस्कार स्वीकारताना अभिमान वाटत आहे. वनक्षेत्रात काम करताना येणाऱ्या आव्हानांचा सामना करीत जंगले वाचविण्याचा आम्ही प्रयत्न करीत असताे. अशा सर्व वनकर्मचाऱ्यांचा हा सन्मान आहे. त्यासाठी लाेकमतचे आभार. वने व पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी पुढेही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली.

- भारती राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, मार्कंडा, आलापल्ली डिव्हिजन

पुरस्कार मिळाल्याने खूप खूप आनंद हाेत आहे. माेठ्या लाेकांकडून काैतुक हाेत आहे आणि प्राेत्साहन मिळत आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या व विशेषत: मुलींच्या शिक्षणासाठी नेहमीच कार्य केले आहे. पुढेही कार्य करीत राहू, याची प्रेरणा मिळाली. महिलांच्या उत्थानासाठी जेवढे शक्य हाेईल, तेवढे कार्य करीत राहू.

- निरू कपाई, संस्थापक, जेके एज्युकेशन साेसायटी, नागपूर

Web Title: A salute to the achievements of talented women; Grand distribution of Vidarbha level 'Lokmat' Jyotsna Sakhi Samman Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.