सुरक्षा रक्षकाची गळफास घेऊन संपविले जीवन

By दयानंद पाईकराव | Published: June 20, 2023 04:59 PM2023-06-20T16:59:25+5:302023-06-20T16:59:52+5:30

सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

A security guard ended his life by hanging himself | सुरक्षा रक्षकाची गळफास घेऊन संपविले जीवन

सुरक्षा रक्षकाची गळफास घेऊन संपविले जीवन

googlenewsNext

नागपूर : दिवसा कपडे शिवण्याचे काम व रात्री सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाऱ्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास शिवनगावच्या विक्तुबाबानगर ते ईसासनी रोडवरील शिवारात घडली आहे.

किलेंद्र मगरु ठाकरे (वय ४५, रा. पंचशीलनगर, लता मंगेशकर हॉस्पीटलजवळ, एमआयडीसी) असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते दिवसा कपडे शिवण्याचे काम तर रात्री सुरक्षा रक्षकाची नोकरी करीत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी, १६ वर्षाची मुलगी आणि १२ वर्षांचा मुलगा आहे. त्यांची पत्नी ही सुद्धा शिवणकाम करते. सोमवारी किलेंद्र यांनी एका झाडाच्या फांदीला दुपट्टा बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

या प्रकरणी निरज शालीकराम बिसेन (वय ३४, रा. एकात्मतानगर) यांनी दिलेल्या सुचनेवरून सोनेगाव ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल मंगलकर यांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे. गळफास घेतलेल्या किलेंद्र यांनी नुकतेच घर बांधले होते. त्यामुळे त्यांच्यावर कर्ज झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शंका त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: A security guard ended his life by hanging himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.