विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्काराचे सावट, जोरदार हालचाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 11:08 AM2023-11-10T11:08:44+5:302023-11-10T11:09:00+5:30

या सर्व प्रकारात नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने १२२.६१ कोटी रुपयांचे बिल थकल्याने शनिवारपासून कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

A slow, vigorous movement to boycott the winter session of the Legislature | विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्काराचे सावट, जोरदार हालचाली सुरू

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्काराचे सावट, जोरदार हालचाली सुरू

नागपूर : येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीबाबत नागपूर ते मुंबईपर्यंत जोरदार हालचाली सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी शहरातील अधिकाऱ्यांना बोलावून वेळेत दर्जेदार काम करण्याचे निर्देश दिले. नागपुरातही तयारीला वेग आला आहे. या सर्व प्रकारात नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने १२२.६१ कोटी रुपयांचे बिल थकल्याने शनिवारपासून कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात संघटनेने गुरुवारी मुख्य अभियंता दिनेश नंदनवार आणि अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांना निवेदन दिले. निवेदनात असे म्हटले आहे की, मागील दोन वर्षांत खाते हेड २०५९ अंतर्गत ७३.७९ कोटी रुपये आणि २२१६च्या लेखाशीर्षाखाली ४८.९३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या कामांची बिले अद्याप अदा केलेली नाहीत. अशा स्थितीत काम करणाऱ्या ठेकेदारांची अवस्था बिकट झाली आहे. बँकेचे कर्ज भरता येत नाही, कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही. यामुळे कंत्राटदार तणावाखाली आहेत. मात्र, दिवाळी सुरू होऊनही विभागाला बिले भरण्यासाठी पैसे मिळाले नाहीत. या स्थितीत निविदा काढूनही त्यांना कामावर बहिष्कार टाकावा लागत आहे.   
अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या शिष्टमंडळासमोरच मुंबईला फोन करून परिस्थितीची माहिती दिली. प्रलंबित बिले अदा करण्यासाठी निधी मंजूर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच ठेकेदारांची जुनी बिले अदा करण्यात येणार आहेत.

Web Title: A slow, vigorous movement to boycott the winter session of the Legislature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर