आज सूर्यास्तावेळी अनुभवता येणार नयनरम्य चंद्रग्रहण; महाराष्ट्रात गडचिरोलीपासून होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 10:49 AM2022-11-08T10:49:11+5:302022-11-08T10:57:57+5:30

नागपूरला हे ग्रहण ५.३२ वाजेपासून पाहता येईल

A spectacular lunar eclipse can be experienced at sunset today | आज सूर्यास्तावेळी अनुभवता येणार नयनरम्य चंद्रग्रहण; महाराष्ट्रात गडचिरोलीपासून होणार सुरू

आज सूर्यास्तावेळी अनुभवता येणार नयनरम्य चंद्रग्रहण; महाराष्ट्रात गडचिरोलीपासून होणार सुरू

Next

नागपूर : संपूर्ण देशात आज चंद्रग्रहण बघायला मिळणार आहे. अरुणाचल प्रदेश व ईशान्य भारताच्या काही भागांत काही काळ खग्रास चंद्रग्रहण दिसेल; पण देशाच्या उर्वरित भागात ते खंडग्रास दिसेल. महाराष्ट्रात गडचिरोली येथे सर्वांत आधी सायंकाळी ५.२९ वाजता ते दिसेल. नागपूरला हे ग्रहण ५.३२ वाजेपासून पाहता येईल. चंद्र हा ग्रहणातच उगवलेला असेल. तब्बल दोन तास हा सोहळा अनुभवता येणार आहे.

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येणार आहेत; पण यावेळी पृथ्वी मध्ये असेल आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार असल्याने हे ग्रहण होईल.

दुपारपासून सुरुवात

अवकाशात चंद्रग्रहणाला दुपारपासूनच सुरुवात होईल. ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेशातून सायंकाळी ४.२३ वाजता चंद्र क्षितिजावर आल्यानंतर खग्रास दिसेल. ईशान्य भागात ग्रहण ९८ टक्के आणि ३ तास दिसेल. त्यानंतर, ते खंडग्रास होण्यास सुरुवात होईल.

कुठे किती वाजता चंद्रग्रहण

गडचिरोली - सायं. ५.२९ वा.
नागपूर - सायं. ५.३२ वा.
चंद्रपूर - सायं. ५.३३ वा.
यवतमाळ - सायं ५.३७ वा.
अकोला - सायं ५.४१ वा.
जळगाव - सायं. ५.४६ वा.
औरंगाबाद - सायं. ५.५० वा.
नाशिक - सायं. ५.५५ वा.
पुणे - सायं. ५.५७ वा.
मुंबई - सायं ६.०१ वा.

Web Title: A spectacular lunar eclipse can be experienced at sunset today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.