भरधाव बसची माेटरसायकलला धडक; दाेघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 08:02 PM2022-09-29T20:02:29+5:302022-09-29T20:03:01+5:30
Nagpur News वेगात जाणाऱ्या बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात माेटरसायकलवरील दाेघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ नागपूर शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
नागपूर : वेगात जाणाऱ्या बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात माेटरसायकलवरील दाेघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ नागपूर शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. ही घटना सावनेर शहरात गुरुवारी (दि. २९) दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
ओमप्रकाश सुकरत मडावी (३३, रा. मंडला, मध्य प्रदेश) व नितीन उपासराव लाडे (२३, रा. हिवराबाजार, ता. रामटेक) अशी जखमींची नावे आहेत. ते दाेघेही कंत्राटदार प्रशांत राऊत यांच्याकडे राेजंदारीवर कामाला हाेते. दाेघेही कामानिमित्त एम.एच.-४०/एच-२४७८ क्रमांकाच्या माेटरसायकलने सावनेरहून गुजरखेडीला जात हाेते. ते या राेडवरील नाग मंदिराजवळ पाेहाेचताच नागपूरहून सावनेर शहरात वेगात येणाऱ्या घाटराेड, नागपूर आगाराच्या एम.एच.-४०/एन-९३८५ क्रमांकाच्या बसने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली.
यात दाेघेही गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांसह हितेश बन्साेड यांनी घटनास्थळ गाठले. बन्साेड यांनी दाेघांनाही लगेच सावनेर शहरातील सरकारी रुग्णालयात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दाेघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी बसचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक व्यंकटेश दाेनाेडे करीत आहेत.