दीक्षाभूमीवर तीन दिवसीय बुद्ध महोत्सव

By आनंद डेकाटे | Published: May 4, 2024 06:43 PM2024-05-04T18:43:45+5:302024-05-04T18:44:35+5:30

भदंत सुरेई ससाई : शंभर बालकांना श्रामणेरची दीक्षा

A three-day Buddha festival at Dikshabhoomi | दीक्षाभूमीवर तीन दिवसीय बुद्ध महोत्सव

A three-day Buddha festival at Dikshabhoomi

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध जयंतीनिमित्त २३ ते २५ मे दरम्यान दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शंभर बालकांना श्रामणेर दीक्षा दिली जाईल.


स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी याबाबतची माहिती दिली. या कार्यक्रमाला बुद्धिस्ट सेमिनरीचे प्रमुख भदन्त धम्मसारथी यांच्यासह भिक्खू संघ व भिक्खुणी संघ उपस्थित राहतील. समारंभात उपस्थित लहानथोर अंगावर काशाय वस्त्र धारण केल्यानंतर आयुष्यभर दहा शीलांचे पालन करण्याचा संकल्प घेतील. श्रामणेर दीक्षा घेऊन तथागत बुद्धांचा धम्म अनुसरण्याचा निर्धार करतील. श्रामणेर यांचे निवासी प्रशिक्षण दीक्षाभूमी स्मारक समितीच्या उंटखाना शाखेतील बुद्धिस्ट सेमिनरीत होईल. सात दिवसीय शिबिरादरम्यान भदन्त धम्मसारथी बुद्ध, धम्म व संघ याविषयी मार्गदर्शन करतील.भदन्त ससाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी २४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता भदन्त धम्मसारथी, भदन्त नागवंश, भदन्त धम्मप्रकाश, भदन्त धम्मविजय, भिक्खूणी संघप्रिया व भिक्खू संघ करुणा, शांती, मैत्री व बुद्धाचा कल्याणाचा मार्ग यावर प्रवचन देतील. शनिवारी २५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता प्रबुद्ध बागडे आणि गायक-कलावंतांतर्फे ‘प्रबुद्ध हो मानवा’ हा बुद्घ-भीमगीतांचा कार्यक्रम सादर करतील. यासोबतच अंगुलीमाल, आम्रपाली लघुनाट्य व भीम गर्जना नृत्य सादर करतील.


- इच्छुकांनी संपर्क साधा
बालकांना श्रामणेर बनविण्याची इच्छा आहे, त्यांच्या पालकांनी इंदोरा बुद्ध विहार व बुद्धिस्ट सेमिनरी, उंटखाना येथे संपर्क साधवा. बालकांच्या डोक्यावरील केस काढून त्यांच्यासाठी काशाय वस्त्र तयार करून ठेवावे, बुद्ध विहारातील भंतेनी बालकांची यादी सादर करावी, असे आवाहन भदन्त ससाई यांनी केले.

Web Title: A three-day Buddha festival at Dikshabhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.