शास्त्रीय नृत्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन; शतस्पंदन पश्चिम क्षेत्रिय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव

By जितेंद्र ढवळे | Published: January 24, 2024 07:06 PM2024-01-24T19:06:50+5:302024-01-24T19:07:01+5:30

सरदार पटेल विद्यापीठ आनंद गुजरात येथील विद्यार्थिनी खुशाली सुतार हिने वर्णम हा नृत्य प्रकार सादर केला.

A vision of Indian culture through classical dance Shataspandan West Regional Inter University Youth Festival | शास्त्रीय नृत्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन; शतस्पंदन पश्चिम क्षेत्रिय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव

शास्त्रीय नृत्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन; शतस्पंदन पश्चिम क्षेत्रिय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या शतस्पंदन या पश्चिम क्षेत्रिय आंतर विद्यापीठ युवा महोत्सवात शास्त्रीय नृत्यातून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. विद्यापीठाच्या गुरुनानक भवन येथे शास्त्रीय नृत्य बुधवारी रोजी पार पडले. डी. वाय. पाटील विद्यापीठ नवी मुंबई येथील विद्यार्थिनी स्नेहा रेड्डी हिने 'दशअवतार पदम' कला प्रकारातून नारायणाच्या नऊ अवतारांचे तिच्या नृत्यातून सादरीकरण केले. सरदार पटेल विद्यापीठ आनंद गुजरात येथील विद्यार्थिनी खुशाली सुतार हिने वर्णम हा नृत्य प्रकार सादर केला.

त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ सोलापूर येथील तेजस्वीनी संजय बनसोडे, शरयू सुधीर देशमुख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील ऋचा कुलकर्णी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची विद्यार्थिनी वैदेही अतुल काकडे, भारती विद्यापीठ पुणे येथील समृद्धी प्रतीक चव्हाण, गुजरात विद्यापीठ अहमदाबाद येथील भगवत प्रजापती, निरमा विद्यापीठ गुजरात येथील वैष्णवी संगानी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टीचर एज्युकेशन गांधीनगरचे केतनभाई दाधानिया पाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथील प्राजक्ता राजकुमार सांगोळे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील मिताली नितीन काळे, गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठ अहमदाबाद येथील आर्ची नवीनचंद्र पटेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची कामाक्षी किशोर हम्पीहोली, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकची शायरीप्रिया प्रकाश मेघे, पारुल विद्यापीठ वडोदरा येथील इंदू वर्मा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील हिमानी संजय महाजन, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील केदार सदानंद गुरव, मुंबई विद्यापीठाची ऋतुजा संतोष शिंदे, वीर नर्मदा दक्षिण गुजरात विद्यापीठ सुरत येथील राधा अजितसिंह गधवी, भक्त कवी नरसिंह मेहता विद्यापीठ जुनागढ गुजरात येथील ध्रुव देवांगभाई त्रिवेदी, एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ पुणे येथील मोमीता मुखर्जी आदी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.

Web Title: A vision of Indian culture through classical dance Shataspandan West Regional Inter University Youth Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर