आकाश इन्स्टिट्यूटची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:09 AM2021-09-19T04:09:47+5:302021-09-19T04:09:47+5:30

नागपूर : आकाश इन्स्टिट्यूटची नीटमध्ये टॉप रँकर्सची परंपरा जेईई २०२१ मध्येही कायम राहिली आहे. आकाश इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी गौतम दासने ...

Aakash Institute's tradition of excellent results continues () | आकाश इन्स्टिट्यूटची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ()

आकाश इन्स्टिट्यूटची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ()

Next

नागपूर : आकाश इन्स्टिट्यूटची नीटमध्ये टॉप रँकर्सची परंपरा जेईई २०२१ मध्येही कायम राहिली आहे. आकाश इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी गौतम दासने जेईई मेन्स २०२१ परीक्षेत सामान्य श्रेणीत ओडिशात टॉप केले आहे. त्याने ९९.९९ पर्संटाईलसह एआयआर २८ रँक मिळविली आहे.

नॅशनल एजन्सीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल)चे मुख्य कार्पोरेट सल्लागार जे. डी. चौधरी यांनी गौतम दासला शुभेच्छा देताना सांगितले की, आमच्यासाठी ही गर्वाची बाब आहे. आमचा विद्यार्थी गौतम दासने जेईई मेन्स २०२१ प्रवेश परीक्षेत चांगले प्रदर्शन केले आहे. त्याचे श्रेय या विद्यार्थ्याच्या कठोर मेहनत, आई-वडील आणि मेंटर्सला जाते. त्यांनी विद्यार्थ्याच्या पूर्ण प्रवासात त्याला मार्गदर्शन केले. मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशात उत्कृष्टता मिळवावी यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी आमची क्वाॅलिटी टेस्ट तयारी इंडस्ट्रीजमध्ये प्रसिद्ध आहे. मी गौतमला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. गौतमने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कठोर मेहनत आणि आकाश इन्स्टिट्यूटच्या चांगल्या कोचिंगला दिले आहे. गौतम म्हणाला, केवळ नियमित क्लासेसच नव्हे, तर एआयएटीएस सारख्या विविध टेस्टमुळे मी यश प्राप्त करू शकलो. चांगल्या ग्रेडसोबत जेईई मेन्सला क्रॅक करण्यासाठी आकाशने प्रदान केलेली गुणवत्तापूर्ण अभ्यासाच्या साहित्यामुळे खूप मदत झाल्याचे सांगितले. त्याने जेईई (ॲडव्हान्स्ड)मध्ये रँक मिळविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रादेशिक संचालक ए. बी. सिंह म्हणाले, मी कोविड १९ च्या कठीण परिस्थितीत जेईई २०२१ मध्ये विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत आनंदी आहोत. याचे श्रेय आमचे फॅकल्टी, प्रशासन आणि बँक अँड टीमने केलेल्या मेहनतीला जाते. त्यांना आपलीच काळजी घ्यायची नव्हती, तर विद्यार्थ्यांचे स्वप्न साकारण्यासाठी कठोर मेहनत करावी लागणार होती. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आम्ही त्वरित ऑनलाईन क्लास सुरू केले आणि जेईईसाठी त्यांची तयारी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या.

.................

Web Title: Aakash Institute's tradition of excellent results continues ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.