कृषी कायद्यांविरोधात नागपुरात आम आदमी पार्टीचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:20 PM2020-12-03T16:20:53+5:302020-12-03T16:21:24+5:30

Nagpur News agitation संविधान चौक येथे नव्या कृषी कायद्याविरोधातील देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी आम आदमी पक्षातर्फे  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आले.

Aam Aadmi Party's dam agitation in Nagpur against agricultural laws | कृषी कायद्यांविरोधात नागपुरात आम आदमी पार्टीचे धरणे आंदोलन

कृषी कायद्यांविरोधात नागपुरात आम आदमी पार्टीचे धरणे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर: संविधान चौक येथे नव्या कृषी कायद्याविरोधातील देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचे रास्त संरक्षण मिळावे आणि आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पक्षातर्फे  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आले.

पंजाब, हरियाणा आणि देश्यातील विविध शेतकरी संघटना मागील सात दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहे. त्यांच्या समर्थनार्थ नागपूर तसेच संपुर्ण महाराष्ट्रात आम आदमी पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन आणि निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले.
दिल्लीच्या राज्याच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला बळाच्या जोरावर दडपून टाकू पाहत आहे. शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून, अश्रूधूर सोडून, हायवेवर खड्डे खणून, शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. ह्याच्या निषेधार्थ आज विरोध प्रदर्शन करण्यात आले आहे .

शेतकरी कायदा रद्द न झाल्यास महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या आंदोलनात आम आदमी पार्टीने पूर्ण ताकदीने सहभागी होण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे. 

या आंदोलनाला राज्य समिति सदस्य देवेंद्र वानखेड़े, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय समिति सदस्य अमरीश सावरकर, नागपुर संयोजक कविता सिंघल, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, नागपुर संघटन मंत्री शंकर इंगोले पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Web Title: Aam Aadmi Party's dam agitation in Nagpur against agricultural laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.