२०२४ साठी आपचं लक्ष्य ठरलं, केजरीवालांकडून नव्या आघाडीची घोषणा, देशवासियांना केलं असं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 05:34 PM2022-05-08T17:34:28+5:302022-05-08T17:35:51+5:30

Arvind Kejriwal News: दिल्लीनंतर पंजाबमध्येही दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी २०२४च्या निवडणुकीसाठीचा अजेंडा जाहीर केला आहे.

AAP goal for 2024, announce New alliance, Arvind Kejriwal an appeal to the People of India | २०२४ साठी आपचं लक्ष्य ठरलं, केजरीवालांकडून नव्या आघाडीची घोषणा, देशवासियांना केलं असं आवाहन

२०२४ साठी आपचं लक्ष्य ठरलं, केजरीवालांकडून नव्या आघाडीची घोषणा, देशवासियांना केलं असं आवाहन

googlenewsNext

नागपूर - दिल्लीनंतर पंजाबमध्येही दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी २०२४च्या निवडणुकीसाठीचा अजेंडा जाहीर केला आहे. २०२४ च्या निवडणुका हे आमचं लक्ष्य नाही आहे. आमचं लक्ष्य देश आहे, भारतमाता आहे. कुणालाही हरवायचं हे आमचं लक्ष्य नाही, तर मला देशाला जिंकवायचं आहे. मी १३० कोटी जनतेची आघाडी उभी करणार आहे, असे सूचक विधान अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

आज लोकमतच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून अरविंद केजरीवाल सहभागी झाले होते. त्यात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची भूमिका या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांनी आपले विचार मांडले. केजरीवाल यांनी मातृदिनाचे स्मरण करत सांगितले की, आज मातृदिवस आहे. आपली एक आई असते. ही आई आपल्याला जन्म देते. तर आपली एक अजून माता आहे. ती म्हणजे आपली भारतमाता. आज मी भाषण सुरू करताना मी तिला अभिवादन करतो. भारता माता की जय!  इन्कलाब झिंदाबाद, वंदे मातरम. यावेळी संपूर्ण सभागृह भारत माता की जय या नाऱ्याने दणाणून केले.

२०२४ च्या राजकारणातीला आम आदमी पक्षाच्या भूमिकेबाबत केजरीवाल म्हणाले, २०२४ ची निवडणूक हे आम आदमी पक्षाचं लक्ष्य नाही आहे. निवडणुका हे लक्ष्य नाही. तर आमचं लक्ष्य भारत आहे. भारत माता आहे. आम्ही आपलं करिअर सोडून भारतमातेसाठी आलो आहोत. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा ४९ दिवसांत मुख्यमंत्री सोडलं. जगात असं दुसरं उदाहरण नसेल. आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे, अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ते पुढे म्हणाले की, केजरीवाल कुणासोबत नॅशनल अलायन्स करणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण मला ह्या १० पक्षांची आघाडी २० पक्षांची आघाडी करणार यामधील काही कळत नाही. मला कुणालाही हरवायचं नाही आहे. मला देशाला जिंकवायचं आहे. २०२४ मध्ये मी १३० कोटी जनतेची आघाडी उभी करणार आहे. मी देशातील डॉक्टर, सीए, पत्रकार, शेतकरी यांची आघाडी उभी करणार आहे. अशा १३० कोटी लोकांना पुढे न्यायचं आहे, असे सांगत केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी केजरीवाल यांनी केंद्रात सत्ता असलेल्या भाजपावर जोरदार टीका केली. ते म्हणाले आपल्याकडे एक मोठा पक्ष आहे. कुठेही गुंडगिरी झाली. दंगा झाला की, त्या लोकांना आपला सदस्य बनवण्यासाठी या पक्षाचे सदस्य पोहोचतात. संपूर्ण देशात गुंडगिरी करतात. बलात्काऱ्यांसाठी शोभायात्रा काढतात. माळा घालतात. अशाने देश कसा पुढे जाणार. अशाने देश पुढे जाणार नाही. तुम्हाला दंगा, गुंडगिरी पाहिजे तर भाजपासोबत जा आणि शाळा, रुग्णालये, प्रगती हवी असेल तर आमच्यासोबत या. जर भ्रष्टाचार हवा तर त्यांच्यासोबत जा आणि कट्टर इमानदारी, कट्टर इमानदारी हवी असेल, तर आमच्यासोबत या. आपण १३० कोटी लोकांची नवी आघाडी आघाडी बनवूया, अशी भूमिका केजरीवाल यांनी मांडली. 

Web Title: AAP goal for 2024, announce New alliance, Arvind Kejriwal an appeal to the People of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.