आप आता स्थानिक निवणुकीत सहभाग घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:32 AM2019-11-17T00:32:47+5:302019-11-17T00:33:52+5:30
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाने आता कंबर कसली आहे. गेल्या निवडणुकीतल पराभवाची कारणमीमांसा करून त्यावरील उपाय आणि मार्ग शोधण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. एवढेच नव्हे तर, विदर्भात होणाऱ्या स्यानिक निवडणुकांमध्ये सहभाग घेण्याचा निर्णयही पक्षाचे घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाने आता कंबर कसली आहे. गेल्या निवडणुकीतल पराभवाची कारणमीमांसा करून त्यावरील उपाय आणि मार्ग शोधण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. एवढेच नव्हे तर, विदर्भात होणाऱ्या स्यानिक निवडणुकांमध्ये सहभाग घेण्याचा निर्णयही पक्षाचे घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पक्षाच्या पूर्व विभागाची चिंतन बैठक पार पडली. त्याय या विषयावर गंभीरपणे चिंतन करण्यात आले. या बैठकीला आपचे राज्य संयोजक रंगा रचुरे, राज्याचे सचिव धनंजय शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. या सोबतच राज्य कमिटी सदस्य देवेंद्र वानखेडे, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग, सावलीच्या अॅड. पारोमिता गोस्वामी, राज्य सह सचिव कविता सिंघल व अशोक मिश्रा, यांच्यासह विधानसभा निवडणुकीतील आपचे सर्व उमेदवार आणि पूर्व विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षाच्या संगठन बांधणीवरही या बैठकीत विचारमंथन झाले. पक्षाचे काम वाढविण्यासाठी जिल्हा स्तर, विधानसभा स्तर आणि बूथ पातळीवर संघटन वाढविण्यावर भर देण्याचा निर्णय झाला आहे. पक्षानणे यापुढे नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलनात्मक भूमिका घेऊन पुढे यावे, असेही ठरविण्यात आले आहे.
बैठकीमध्ये रंगभाऊ राचुरे यांनी राजकीय व सामाजिक परिस्थिती आणि आम आदमी पक्षाची भूमिका मांडली. आगामी काळासाठी रणनीती, विचारधारा आंदोलनाचे मुद्दे, स्वरूप आणि निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी काय करायला हवे, यावर मार्गदर्शन केले. धनंजय शिंदे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपरिषद, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत स्थानिक रणनीती, राजकीय संबंधांबद्दल विचार मांडले. लोकप्रतिनिधी मिडिया, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधणे, नवीन सदस्य व कार्यकर्ता अभियान या विषयांवर चर्चा केली.
देवेंद्र वानखडे यांनी जिल्हा व विधानसभा कार्यकारिणी, जबाबदारी व कर्तव्य, संघटना विस्तार या विषयांवर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिले. अशोक मिश्रा व श्रीमती कविता यांनी पक्षाची भूमिका व पार्टी एकसंघता या विषयांवर प्रकाश टाकला. पारोमिता गोस्वामी यांनीही आपले अनुभव सांगितले. जगजीत सिंग यांनी फंड तसेच वर्गणी, खर्च, इव्हेंटनुसार खर्च, नियमित खर्च, खर्च सादर करणयची पद्धत उपस्थितांना समजाऊन सांगितली. बैठकीला पूर्व विदर्भातून पदाधिकारी उपस्थित होते.