पहाटे ३.३० वाजता 'आपली बस' आगीत खाक; कडबी चौकातील घटना
By मंगेश व्यवहारे | Updated: February 17, 2024 12:11 IST2024-02-17T12:10:58+5:302024-02-17T12:11:45+5:30
अग्निशमनच्या पथकाने ५ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले होते.

पहाटे ३.३० वाजता 'आपली बस' आगीत खाक; कडबी चौकातील घटना
नागपूर : शनिवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास कडबी चौकात भर रस्त्यावर 'आपली बस' जळून खाक झाली. बसचा क्रमांक एसएच३१-सीए-६११० आहे. बसचालकाच्या सांगण्यानुसार बस खापरी डेपोची असून, बस चालवत असताना सेल पासून शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. अग्निशमन विभागाला घटनास्थळावरून आग लागण्याचा कॉल आल्याबरोबर सूगतनगर अग्निशमन केंद्राची गाडी घटनास्थळावर रवाना झाली. त्यानंतर लगेच सिव्हील कार्यालयातूनही गाडी पाठविण्यात आली.
अग्निशमनच्या पथकाने ५ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले होते. परंतु आगीत संपूर्ण बस खाक झाली असून, कुठलीही जिवितहाणी झालेली नाही. आपली बसचे व्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बस सीएनजीवर होती. १४ वर्ष ३ महिने जुलेली असलेली बस ५ लाख रुपये किंमतीची होती. आगीत बसचे ८ सीएनजी टॅँक, टायर, सीट व संपूर्ण बसच खाक झाली आहे.