आराेपी पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:09 AM2021-03-27T04:09:15+5:302021-03-27T04:09:15+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : चारित्र्यावर संशय घेत पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण करीत तिचा खून करणाऱ्या आराेपी पतीस अतिरिक्त ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : चारित्र्यावर संशय घेत पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण करीत तिचा खून करणाऱ्या आराेपी पतीस अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पाटील यांच्या न्यायालयाने जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. खुनाची ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) शहरात २४ जुलै २०१६ राेजी सायंकाळी ५.२६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली हाेती.
विशाल चंदू वाटाेळे (३४, रा. यशवंतनगर, तारसाराेड, कन्हान, ता. पारशिवनी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आराेपी पतीचे तरमंगला विशाल वाटाेळे (२२) असे मृत पत्नीचे नाव आहे. लग्नानंतर विशाल मंगलाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. याच संशयातून त्या दाेघांमध्ये नेहमीच भांडणेही व्हायची. दरम्यान, २४ जुलै २०१६ राेजी या पती, पत्नीतील वाद विकाेपास गेला. त्यामुळे विशालने मंगलाला शिवीगाळ करीत मारहाण करायला सुरुवात केली.
यात त्याने मंगलाच्या डाेक्यावर लाकडी दांड्याने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे कन्हान पाेलिसांनी सहायक पाेलीस निरीक्षक विजय यांच्या तक्रारीवरून भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी पती विशालला २४ जुलै २०१६ राेजी रात्री अटक केली. सहायक पाेलीस निरीक्षक देवानंद लाेणारे यांनी या संपूर्ण घटनेचा तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.
या प्रकरणाचा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पाटील यांच्या न्यायालयाने दाेन्ही बाजूंचे साक्ष पुरावे तपासून निवाडा दिला. यात न्यायालयाने आराेपी विशालला दाेषी ठरवित भादंवि ३५२ (२) व ३०२ अन्वये जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दंडाच्या रकेमचा भरणा न केल्यास सहा महिने अतिरिक्त सक्त कारावासाचीही शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकाच्या वतीने सरकारी वकील पांडे यांनी युक्तिवाद केला. तपास कार्यात सहायक फाैजदार वासुदेव मस्के, शंकरराव तराळे, नत्थू इवनाते, पाेलीस हवालदार मनाेज तिवारी, सुनील डाेंगरे, अशाेक शुक्ला यांनी सहायक पाेलीस निरीक्षक देवानंद लाेेणारे यांना मदत केली.