आरे वाचविले, अजनी वनही वाचविणार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:22+5:302021-07-08T04:07:22+5:30

नागपूर : ज्याप्रमाणे मुंबईचे आरे वन वाचविले, तसे नागपुरातील अजनी वनही वाचविणार, येथील झाडांना धक्का लागू देणार नाही, असा ...

Aarey saves, Ajni will also save the forest () | आरे वाचविले, अजनी वनही वाचविणार ()

आरे वाचविले, अजनी वनही वाचविणार ()

Next

नागपूर : ज्याप्रमाणे मुंबईचे आरे वन वाचविले, तसे नागपुरातील अजनी वनही वाचविणार, येथील झाडांना धक्का लागू देणार नाही, असा इशारा देत शेकडाे शिवसैनिकांनी बुधवारी संपर्कप्रमुख व आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात महापालिकेसमाेर तीव्र आंदाेलन केले. अजनी परिसरात प्रस्तावित आयएमएस प्रकल्पासाठी पर्याय शाेधावेत, असे आवाहन करीत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे इंटर माॅडेल स्टेशन साकारले जात आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ४,९३० झाडे ताेडण्याबाबत महापालिकेने नाेटीस लावले आहेत. मात्र प्रकल्पाबाबत याेग्य आराखडा नाही, पर्यावरणाची परवानगी घेतली नसताना झाडे ताेडण्यासाठी एवढा उतावीळपणा का, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. एकीकडे एकेक झाड लावण्यासाठी व त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करावा लागताे आणि दुसरीकडे हजाराे झाडे कापली जाणार आहेत. काेराेना महामारीत ऑक्सिजनचे महत्त्व लाेकांना समजले आहे. मनपाची सत्ता भाेगणाऱ्या भाजपने १५ वर्षांत शहर खिळखिळे केले व पर्यावरणाचा सत्यानाश केला आहे. आता अजनीतील हजाराे झाडे कापून ऑरेंज सिटीच्या फुफ्फुसात ऑक्सिजनऐवजी सिमेंट भरले जात असल्याची घणाघाती टीका चतुर्वेदी यांनी केली. विकासाला विराेध नाही, पण हा प्रकल्प पर्यावरणाला कमीतकमी नुकसान हाेईल अशा ठिकाणी साकार करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, सुरेश साखरे, शहर प्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे, नगरसेविका मंगला गवरे, मंदाकिनी भावे, विशाल बरबटे, मंगेश काशीकर, किशोर पराते, मुन्ना तिवारी, योगेश गोन्नाडे, बंडू तळवेकर, गुड्डू रहांगडाले, नाना झोडे, विक्रम राठोड, नितीन नायक, सुरेखा खोबरागडे, माधुरी पालीवाल, सुशीला नायक आदी कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी सहभागी हाेते.

Web Title: Aarey saves, Ajni will also save the forest ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.