आरती सिंह सीआयडीच्या अधीक्षक

By Admin | Published: January 14, 2016 03:39 AM2016-01-14T03:39:22+5:302016-01-14T03:39:22+5:30

नागपूर जिल्हा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

Aarti Singh CID Superintendent | आरती सिंह सीआयडीच्या अधीक्षक

आरती सिंह सीआयडीच्या अधीक्षक

googlenewsNext

नागपूर : नागपूर जिल्हा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. सिंह यांची तडफदार अधिकारी म्हणून ओळख आहे.
डॉ. आरती सिंह या २००६ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे पोलीस उपविभागीय अधिकारी (परिविक्षाधीन) म्हणून त्यांनी सुरुवात केली. ६ जून २०११ पासून भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. १७ जानेवारी २०१४ रोजी नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदभार त्यांनी स्वीकारला. रुजू होताच त्यांनी नागपूर जिल्हा ग्रामीणची अनेक वर्षे बंद असलेली वेबसाईड सुरू केली.
ग्रामीण पोलिसांचे पगारपत्रक आॅनलाईन केले. ग्रामीण भागातील अवैध धंदे आणि रेती माफियांवर नियंत्रण मिळविण्यासही त्यांना बऱ्यापैकी यश आले. सिंह यांचा पोलिंसावर चांगलाच वचक आहे. कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास त्याची तातडीने दखल घेणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. देशभरात गाजलेल्या निर्भया हत्याकांडानंतर नागपूर ग्रामीण भागातील शाळांमध्ये खास विद्यार्थिनींसाठी त्यांच्यामुळेच तक्रार पेटीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या एकूणच कामाची पद्धत पाहता त्यांची सीआयडी अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Aarti Singh CID Superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.