हिंसक वृत्तीचा त्याग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:07 AM2021-04-26T04:07:57+5:302021-04-26T04:07:57+5:30
- आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांचे मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या पर्वावर श्री धर्मराजश्री ...
- आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांचे मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या पर्वावर श्री धर्मराजश्री तपोभूमी दिगंबर जैन ट्रस्ट आणि धर्मतीर्थ विकास समितीच्या वतीने ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांनी भाविकांना हिंसक वृत्ती त्यागण्याचे आवाहन केले. शोषण आणि अत्याचार करून संपत्ती मिळवायची नाही. महावीरांचे अनुयायी आहात म्हणून मानवतेचे धडे गिरवा. आपल्या आचरणात अहिंसा बाळगा. मूक प्राण्यांना मारू नका. महावीरांचे अनुयायी अणुव्रती श्रावक आहेत. खोटे बाेलू नका. तुमच्या खोटे बोलण्याने कुणाचा जीव जात नसेल तर तुम्ही महावीरांचे अनुयायी आहात. जो प्रत्येक स्त्रीकडे मातृत्वाच्या भावनेने बघतो, तो महावीरांचा अनुयायी आहे. हिंसेला ज्याच्याकडे थारा नसेल तो महावीरांचा अनुयायी आहे. हिंसा आणि खोटेपणाचा त्याग करावा लागेल. कुणाचे मन दुखवू नका. कोणाची संपत्ती हडपू नका. तुम्हाला जेवढी गरज आहे, तेवढे ठेवून उर्वरित धनाचा त्याग करा. आपल्याला तीर्थंकर मिळाले, हे आपले भाग्य आहे. महावीरांच्या जन्माच्या वेळी पृथ्वी स्वर्ग बनली होती. महावीर स्वामींच्या जन्मावताराने पृथ्वीवर शांती धारा वाहायला लागली. धर्मासाठी खाणे, धर्मासाठी पिणे, धर्माचाच विचार करणे, धर्मकार्य करतानाच समाधिमरण स्वीकारणे, हे महावीरांच्या सच्च्या अनुयायांचे गुण असल्याचे आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यावेळी म्हणाले.
..................