अपहरण झालेला अधिकारी अडकला होता ‘हनी ट्रॅप’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 09:46 PM2020-08-24T21:46:19+5:302020-08-24T21:47:56+5:30

औषध कंपनीच्या अधिकाऱ्याला हनी ट्रॅप द्वारे लुटण्यात आले होते. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासह तीन आरोपींना अटक केली.

The abducted officer was trapped in a honey trap | अपहरण झालेला अधिकारी अडकला होता ‘हनी ट्रॅप’मध्ये

अपहरण झालेला अधिकारी अडकला होता ‘हनी ट्रॅप’मध्ये

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : औषध कंपनीच्या अधिकाऱ्याला हनी ट्रॅप द्वारे लुटण्यात आले होते. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासह तीन आरोपींना अटक केली. सूत्रधार व त्याची मैत्रीण फरार आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव सुमित ऊर्फ दद्दू व्यंकटराव परिहार (२१) रा. वैशालीनगर, गन्नू वाटेश्वर मंडळ (२२) वैशालीनगर तसेच तुषार ऊर्फ मोनू ऊर्फ तोत्या अशोक जगताप (१९) रा. अमरनगर आहे. तसेच आरोपी रजत ऊर्फ छोटू ठाकूर व त्याची प्रिया नावाची प्रेमिका फरार आहे.
२१ ऑगस्टच्या दुपारी औषध कंपनीच्या अधिकाऱ्याचे अपहरण करून ८ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यामुळे लुटपाट करून चार तासानंतर त्याला सोडून देण्यात आले. परंतु यामागचे काहीतरी दुसरे कारण आहे, असा संशय पोलिसांना होता. पोलिसांना संजयच्या मित्राकडून पैसे घेण्यासाठी आलेल्या युवतीची सीसीटीव्हीद्वारे माहिती मिळाली. त्याच आधारावर पोलिसांनी पुढचा तपास करायला घेतला. पोलिसांनी संजयला विश्वासात घेऊन चौकशी केली असता प्रकरण समोर आले. सूत्रांच्या सांगण्यानुसार प्रिया व तिचा प्रेमी रजत ठाकूर हनी ट्रॅप रॅकेटचा सूत्रधार आहे. प्रिया तुमसर येथील आहे. ती किरायाने राहते. ती संपन्न व्यक्तीसोबत मैत्री करायची. त्याला रूममध्ये बोलावून रजत व अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने धमकावून लुटपाट करायची. सोनेगाव ठाण्यात त्यांच्याविरुद्ध हप्तावसुलीचा गुन्हाही दाखल आहे. पीडित तक्रार दाखल करीत नसल्यामुळे ते पोलिसांच्या जाळ्यात सापडत नव्हते.
या प्रकरणात प्रियाने संजयला सुमित परिहार याच्या फ्लॅटवर बोलाविले. सुमित इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. त्याने अभ्यासासाठी फ्लॅट भाड्याने घेतला आहे. संजय तिथे पोहचल्यानंतर रजत ठाकूर अन्य साथीदारासोबत तिथे आला. तो प्रियाला बहीण असल्याचे भासवून संजयला धमकावू लागला. त्याचे जबरदस्तीने प्रियासोबत फोटोही काढले. बदनामी करण्याची धमकी देऊन मारपीट करू लागला. भयभीत होऊन संजयने त्याला पैसेही दिले. सत्य परिस्थिती लक्षात आल्यावर पोलिसांनी सुमित परिहारच्या फ्लॅटवर छापा मारून त्याला अटक केली. त्याचबरोबर इतर दोघांनाही ताब्यात घेतले. प्रिया रजतसोबत फरार झाल्याचा संशय आहे. ही कारवाई डीसीपी विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हेमंत खराबे, एपीआय रमेश हत्तीगोटे, पीएसआय विजय नेमाडे, अरविंद मोहोड, हवालदार विनायक मुडे, आशिष दुबे तसेच प्रिया हिरवानी यांनी केली.

Web Title: The abducted officer was trapped in a honey trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.