नागपुरात भूलथापा देऊन अल्पवयीन मुलीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 09:27 PM2020-08-20T21:27:35+5:302020-08-20T21:28:46+5:30

बालाघाटमधील एका युवकाने प्रेमसंबंधातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. ही घटना लकडगंज ठाण्यांतर्गत घडली.

Abduction of a minor girl in Nagpur by intusing | नागपुरात भूलथापा देऊन अल्पवयीन मुलीचे अपहरण

नागपुरात भूलथापा देऊन अल्पवयीन मुलीचे अपहरण

Next
ठळक मुद्दे कामगाराचे कृत्य : लकडगंज ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : बालाघाटमधील एका युवकाने प्रेमसंबंधातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. ही घटना लकडगंज ठाण्यांतर्गत घडली.
अंकित गेडाम (२३) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी १७ वर्षांची असून बारावीची विद्यार्थिनी आहे. आरोपी विद्यार्थिनीच्या घरासमोर सुरू असलेल्या बांधकामावर काम करीत होता. तेव्हापासून त्याची तिच्यावर नजर होती. विद्यार्थिनी गरीब कुटुंबातील आहे. तो १९ ऑगस्टला तिला घेऊन पळून गेला. मुलगी घरी नसल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यांना अंकितसोबत तिची ओळख असल्याची माहिती नव्हती. अंकितही कामावरून गायब झाल्यामुळे कंत्राटदाराला शंका आली. त्याने माहिती घेतली असता अंकित मानकापूरमध्ये काम करीत असल्याची माहिती मिळाली. विद्यार्थिनीचे आई-वडील त्वरित मानकापूरला पोहोचले. तिचे आईवडील येणार आहेत हा धोका ओळखता अंकित फरार झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी लकडगंज ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसाच्या आत लकडगंज ठाण्यातील हा दुसरा गुन्हा आहे. १७ ऑगस्टलाही एका दहावीच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. ऑनलाईन अभ्यास असल्यामुळे ती मोबाईलवर व्यस्त राहत होती. कामाच्या निमित्ताने घराबाहेर गेल्यानंतर तिचा काही शोध लागला नाही. पोलिसांनी माहिती घेतली असता ती कारमधून गेल्याचे समजले. दोन दिवसात या घटना घडल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत. कामात व्यस्त असल्यामुळे आईवडिलांनाही मुले काय करतात, याची माहिती होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना शोधणे कठीण होते.

Web Title: Abduction of a minor girl in Nagpur by intusing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.