नागपुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अब्दुल गफूर पारेख यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 10:28 AM2019-08-17T10:28:55+5:302019-08-17T10:29:25+5:30

शहरातील प्रसिद्ध प्लायवूड व्यावसायिक व पदमभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख यांचे सुपुत्र अब्दुल गफूर पारेख यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते.

Abdul Ghafoor Parekh, a senior social activist in Nagpur, passed away | नागपुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अब्दुल गफूर पारेख यांचे निधन

नागपुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अब्दुल गफूर पारेख यांचे निधन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील प्रसिद्ध प्लायवूड व्यावसायिक व पदमभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख यांचे सुपुत्र अब्दुल गफूर पारेख यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
पारेख व्यवसाय समूहाची धुरा सांभाळताना त्यांनी वडिलांकडून मिळालेला सामाजिक कार्याचा वारसाही जबाबदारीने सांभाळला. जात, धर्म, पंथ, भाषा, रंग असा भेदभाव न करता केवळ मानवी मूल्यांना महत्त्व देत भुकेल्याला अन्न, गरजूंना मदत आणि गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करण्यात त्यांनी कायम पुढाकार घेतला होता. इंग्रजी, उर्दू, हिंदी, मराठी व गुजराती भाषेवर प्रभुत्व असलेल्या अब्दुल गफू र यांनी अरबी भाषा शिकविण्यात उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी २०० तासात अरबी शिकण्याचे तंत्र विकसित केले व ते भारतासह जगभरातील विद्यार्थ्यांना शिकविले. त्यांचे हे तंत्र भारत व इतर देशांच्या विद्यापीठांनीही आत्मसात केले आहे. एक वक्ता म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळविला होता. राजकारण व प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या अब्दूल पारेख यांनी आयुष्यभर मानवी मूल्यांचा प्रसार केला.

Web Title: Abdul Ghafoor Parekh, a senior social activist in Nagpur, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू