अबे, भैताडा... तर्री पोहा खातंस का; मेट्रोच्या पिलरवर रंगला नागपुरी तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 10:58 AM2021-03-17T10:58:13+5:302021-03-17T10:58:36+5:30

Nagpur News मेट्रो स्टेशनचे आधुनिकपण, त्यातील कमालीची स्वच्छता, तेथील शिस्त याची चर्चा चार मंडळी जमली की होतच असते. अलीकडे या चर्चेत अजून एक मुद्दा समाविष्ट झाला आहे.

Abe, Bhaitada ... of Tarri Poha Khatans; Local language on Metro Pillar | अबे, भैताडा... तर्री पोहा खातंस का; मेट्रोच्या पिलरवर रंगला नागपुरी तडका

अबे, भैताडा... तर्री पोहा खातंस का; मेट्रोच्या पिलरवर रंगला नागपुरी तडका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शहरात सुरू झालेली मेट्रो भलेही लोकांच्या अंगवळणी पडली नसो, त्यात एकदा बसून फिरण्याची हौस बहुतेक नागपूरकरांनी भागविली आहे. मेट्रो ही एकाअर्थाने नागपूरची शान बनली आहे. मेट्रो स्टेशनचे आधुनिकपण, त्यातील कमालीची स्वच्छता, तेथील शिस्त याची चर्चा चार मंडळी जमली की होतच असते. अलीकडे या चर्चेत अजून एक मुद्दा समाविष्ट झाला आहे.
तो आहे, सदर भागातील मेट्रोच्या पिलरवर रंगविलेल्या मजकुराचा. हाव नं गा.. काऊन तं.. मले जाम टेंशन येते लेका... भैताड... बाव्वा... तर्री पोहे.. हे शब्द म्हणजे नागपूरकरांच्या पठडीतील. एका अर्थाने जगाच्या पाठीवर कुठेही गेलेला नागपूरकर या अशाच शब्दांनी ओळखला जातो. मेट्रोच्या प्रत्येक स्टेशनला ओळख दिली जात आहे. त्यात सदरच्या स्टेशनजवळच्या पिलरवर नागपुरात बोलल्या जात असलेल्या बोली भाषेतील काही ठरावीक उद्गार व शब्द चित्रबद्ध केलेले आहेत. ते येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष तर वेधून घेतच आहेत, शिवाय ते वाचताना त्यांच्या चेहºयावर मिश्कील हसूही आणत आहेत.

काय आहेत हे शब्द वा उद्गार?
या पिलरवर लिहिलेल्या शब्दांमध्ये भैताड (बावळट, मूर्ख अशा अर्थाने वापरला जाणारा शब्द), काऊन बे (कशासाठी), शायनिंग मारता क्या (जास्त हुशार बनू नकोस), हाओ (होय), ब्बावा (अरे बाबा) असे खास वैदर्भीय ढंगात उच्चारले जाणारे शब्द यावर अंकित केले गेले आहेत.

Web Title: Abe, Bhaitada ... of Tarri Poha Khatans; Local language on Metro Pillar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो