‘अभंगवाणी’ने संत चोखामेळा यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:18+5:302021-05-31T04:07:18+5:30
फोटो ‘अभंगवाणी’ने संत चोखामेळा यांना अभिवादन नागपूर : संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथीच्या पर्वावर रविवारी ‘अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर झाला. ...
फोटो
‘अभंगवाणी’ने संत चोखामेळा यांना अभिवादन
नागपूर : संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथीच्या पर्वावर रविवारी ‘अभंगवाणी’ हा कार्यक्रम सादर झाला. नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या वतीने ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात गणेश गुजर यांनी संत चोखामेळा रचित ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ या अभंगाने केली. त्यानंतर संत तुकारामांच्या ‘येई गा तू माय बापा’ हा अभंग सादर केला. अनुराज गुजर यांनी संत नामदेवांची रचना ‘नाम गाऊ ना ध्याऊ’, वीर केळकर यांनी ग.दि. माडगुळकर यांची रचना ‘कानडा राजा पंढरीचा’ सादर केली. संत गुलाबराव महाराज यांची भैरवी ‘ज्ञानदेव योगी राजा समाधी तू साधिली’ने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी तबल्यावर निषाद चरडे, ऑक्टोपॅडवर अनिकेत सहारे, की बोर्डवर कुमार सहारे, बासरीवर आकाश सैतवाळ यांनी साथसंगत केली. निवेदन योगीता गुजर यांचे होते.
.................