पाणीपट्टीची अभय योजना फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:08 AM2021-02-24T04:08:37+5:302021-02-24T04:08:37+5:30

फक्त १७ टक्के थकबाकीदारांचा प्रतिसाद लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : थकबाकीदारांची संख्या कमी करण्यासाठी मनपा प्रशासनाने अभय योजना आणली. ...

Abhay Yojana of Panipatti fails | पाणीपट्टीची अभय योजना फेल

पाणीपट्टीची अभय योजना फेल

Next

फक्त १७ टक्के थकबाकीदारांचा प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : थकबाकीदारांची संख्या कमी करण्यासाठी मनपा प्रशासनाने अभय योजना आणली. परंतु या योजनेला थकबाकीदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. एकंदरीत ही योजना नापासच ठरली. १७ टक्के थकबाकीदारांनी १७.३८ कोटी थकबाकी जमा केली.

वास्तविक २.५७ लाख थकबाकीदारांकडे १०१.४३ कोटींची थकबाकी होती. दंडातून सूट मिळण्यासाठी थकबाकी एकमुस्त भरणे अपेक्षित होते. २२ फेब्रुवारीला ही योजना संपली. २१ जानेवारीपर्यंत थकबाकी भरणाऱ्यांना शंभर टक्के दंड माफ करण्यात आला. नंतर ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतरही थकबाकीदारांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही.

जलप्रदाय विभागाच्या नोंदीनुसार ३.७२ लाख नळ कनेक्शन्स आहेत. यातील २.५७ लाख थकबाकीदार आहेत. याचा विचार करता थकबाकीदारांची यादी मोठी आहे. त्यांच्याकडे २१२.६७ कोटी थकीत आहे. यात ९८.५१ कोटी मूळ रक्कम आहे. जलप्रदाय विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३५९६९ ग्राहकांनी थकबाकी जमा केली. पूर्व नागपुरातील सतरंजीपुरा व लकडगंज झोनमध्ये सर्वाधिक थकबाकीदार आहेत. येथील थकबाकीदारांकडे अनुक्रमे १२.१५ कोटी व १४.९५ कोटी थकीत आहेत. या दोन्ही झोनमध्ये योजनेंतर्गत फक्त ४.४० कोटींची वसुली झाली. विशेष म्हणजे यापूवीं दोनदा अभय योजना आणली. त्यावेळीही प्रतिसाद मिळाला नव्हता. वर्ष २०१६-१७ मध्ये १२.४५ कोटी, तर वर्ष २०१७-१८ या वर्षात १३.८० कोटी वसूल झाले होते.

....

मालमत्ता करातही निराशा

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठीही अभय योजना राबविण्यात आली. परंतु मालमत्ता धारकांनी प्रतिसाद दिला नाही. फक्त ११ टक्के थकबाकीदारांनी रक्कम जमा केली. मालमत्ता कराची सुमारे ४०० कोटींची थकबाकी होती. ३.७३ मालमत्ताधारक थकबाकीदार आहेत. यातील ५०५४८ थकबाकीदारांनी ४३.८८ कोटी जमा केले.

Web Title: Abhay Yojana of Panipatti fails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.