अभिजित बांगर नवे नागपूर मनपा आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:46 AM2018-11-14T00:46:06+5:302018-11-14T00:47:15+5:30

अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्तमान आयुक्त वीरेंद्र सिंह यांची नवी मुंबई येथे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तब्बल दोन महिन्यांपासून प्रभारी आयुक्तांच्या भरवशावर असलेल्या नागपूर महानगरपालिकेला अखेर बांगर यांच्या रुपात पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत.

Abhijit Bangar is the new Nagpur Municipal Commissioner | अभिजित बांगर नवे नागपूर मनपा आयुक्त

अभिजित बांगर नवे नागपूर मनपा आयुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देवीरेंद्र सिंह यांची बदली : अखेर पूर्णवेळ आयुक्त मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्तमान आयुक्त वीरेंद्र सिंह यांची नवी मुंबई येथे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तब्बल दोन महिन्यांपासून प्रभारी आयुक्तांच्या भरवशावर असलेल्या नागपूर महानगरपालिकेला अखेर बांगर यांच्या रुपात पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत.
अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर हे कार्यतत्पर व कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात. ते २००८ सालच्या ‘बॅच’चे अधिकारी आहेत. बांगर हे मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील असून अनेक वर्षे त्यांचे वास्तव्य बार्शी येथे होते. त्यांनी पुणे येथे अर्थशास्त्र या विषयात एम. ए. केले आहे काही काळ तेथील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये ते प्राध्यापकदेखील होते. नागपूर येथे जिल्हा सहायक अधिकारी, रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी म्हणून कामाचा त्यांना अनुभव आहे. त्याचप्रमाणे रायगड व सातारा येथे ते प्रत्येकी दोन वर्षे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. पालघरचे पहिले जिल्हाधिकारी म्हणूनदेखील त्यांनी काम केले. पालघरमधील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले होते. अमरावतीतदेखील सुमारे दीड वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याने पदभार सांभाळला.

मुख्यमंत्र्यांनी दिले होते संकेत
वीरेंद्र सिंह यांची मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मनपाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. खर्चाला मर्यादा घातल्या. यावरून पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला. तेव्हापासून ते शहरात राहण्यास फारसे उत्सुक नसल्याचे जाणवले. दरम्यान कौटुंबिक कारणांमुळे ते दोन महिने सुटीवर होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त असलेले रवींद्र ठाकरे यांच्याकडे मनपा आयुक्तांचा प्रभार देण्यात आला. नुकतेच वीरेंद्र सिंह नागपूरला आले होते. ते रुजू होतील, अशी अपेक्षा होती. परंतु तसे झालेच नाही. त्यामुळे नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदाबाबत बरीच चर्चा सुरु होती. मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनीच नवीन बदलांबाबत संकेत दिले होते.

Web Title: Abhijit Bangar is the new Nagpur Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.