‘अभिनंदन’च्या जिगरीला नागपूरकरांचे वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 01:20 AM2019-03-02T01:20:25+5:302019-03-02T01:23:21+5:30

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागपूरकरांकडून सातत्याने विविध माध्यमांतून नियमित ‘अपडेट्स’ घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र शुक्रवारचा दिवस काहिसा वेगळा होता. प्रत्येक नागरिकाच्या मनात सकाळपासून काहीशी हुरहूर, उत्सुकता दिसून येत होती. दिवसभर एकमेकांना ‘ते आले का’ असाच प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र जसजसा दिवस मावळत गेला, अस्वस्थता वाढत गेली. अचानक रात्री ९ च्या सुमारास ‘टीव्ही’वर त्याचे दर्शन झाले. त्याचा आविर्भाव, ताठ मान, नजरेतील भेदकता, चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि नसानसात भिनलेली राष्ट्रसेवेची भावना हे पाहिले अन् बहुतांश जणांच्या अंगावर काटा आला. रोमांचित झालेल्या स्वरांतून आपोआप शब्द बाहेर निघाले, ‘भारताचा ढाण्या वाघ परतला’. सुमारे ६० तास पाकिस्तानच्या तावडीत राहून सुखरुपपणे भारतात परतलेले वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री ९.१५च्या सुमारास भारतात परतल्यानंतर नागपूरकरांनी जोरदार जल्लोष केला.

Abhinandanchya Jigarila Nagpurkaranche Vandan | ‘अभिनंदन’च्या जिगरीला नागपूरकरांचे वंदन

‘अभिनंदन’च्या जिगरीला नागपूरकरांचे वंदन

googlenewsNext
ठळक मुद्देठिकठिकाणी झाले ‘सेलिब्रेशन’ : देशाचा वाघ परत आल्याची भावना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागपूरकरांकडून सातत्याने विविध माध्यमांतून नियमित ‘अपडेट्स’ घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र शुक्रवारचा दिवस काहिसा वेगळा होता. प्रत्येक नागरिकाच्या मनात सकाळपासून काहीशी हुरहूर, उत्सुकता दिसून येत होती. दिवसभर एकमेकांना ‘ते आले का’ असाच प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र जसजसा दिवस मावळत गेला, अस्वस्थता वाढत गेली. अचानक रात्री ९ च्या सुमारास ‘टीव्ही’वर त्याचे दर्शन झाले. त्याचा आविर्भाव, ताठ मान, नजरेतील भेदकता, चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि नसानसात भिनलेली राष्ट्रसेवेची भावना हे पाहिले अन् बहुतांश जणांच्या अंगावर काटा आला. रोमांचित झालेल्या स्वरांतून आपोआप शब्द बाहेर निघाले, ‘भारताचा ढाण्या वाघ परतला’. सुमारे ६० तास पाकिस्तानच्या तावडीत राहून सुखरुपपणे भारतात परतलेले वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री ९.१५च्या सुमारास भारतात परतल्यानंतर नागपूरकरांनी जोरदार जल्लोष केला.
शहरात सकाळपासूनच अभिनंदन यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. कुठे सायंकाळीच मिठाईचे वाटप झाले तर कुठे होमहवन करण्यात आले. सायंकाळनंतर नागरिकांमधील अस्वस्थता वाढली होती. घरांघरात, विविध कट्ट्यांवर तसेच ‘सोशल मीडिया’वर अभिनंदन यांच्याबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र ते सुखरूपपणे परतल्यानंतर अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विविध संघटनांनी रात्रीच्या सुमारास ढोलताशांचा गजर केला. अनेक चौकात ‘भारत माता की जय’ व ‘अभिनंदन तू है देश का गौरव’ अशा आशयाच्या घोषणा देण्यात येत आल्या.
‘सोशल मीडिया’वर आनंदोत्सव
‘सोशल मीडिया’वरदेखील नागपूरकरांनी आनंदोत्सव साजरा केला. कल्पनाशक्ती लढवत एकाहून एक सरस ‘पोस्ट’ तयार करण्यात येत होत्या. काही उत्साही तरुणांनी तर अभिनंदन देशात परत असताना शंखनाद करुन स्वागत केले व ते ‘व्हिडीओ’ अपलोड केले.

Web Title: Abhinandanchya Jigarila Nagpurkaranche Vandan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.