वूडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्व नागपूरच्या अभिषेक आत्रामकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 10:26 AM2018-07-25T10:26:00+5:302018-07-25T10:26:23+5:30
आठव्या वूडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्व नागपूरचा अभिषेक आत्राम करणार आहे. स्पर्धेचे आयोजन २४ ते ३० जुलै या कालावधीत थायलंडमधील चांगमई शहरात होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आठव्या वूडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्व नागपूरचा अभिषेक आत्राम करणार आहे. स्पर्धेचे आयोजन २४ ते ३० जुलै या कालावधीत थायलंडमधील चांगमई शहरात होत आहे. हाच संघ दहाव्या थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सहभागी होणार असल्याची माहिती वूडबॉल असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष आ. डॉ. आशिष देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
आज मुंबईमार्गे भारतीय संघ स्पर्धास्थळी रवाना झाला. वेदांत पाटील याच्याकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
भारतीय संघात हेमंत पायेर, देवांग शाह,मीर खलिल अहमद, वेदांत खाडिया,समीर सावंत, आदर्श खंडिका,सन्नी कुमार आणि विवेक कुमार आणि कु. क्रिशा दोशी हिचा समावेश आहे. प्रशिक्षक हेमंत भालेराव, सहप्रशिक्षक सुदीप मानवटकर आणि पथक प्रमुख वूडबॉल फेडरेशनचे महासचिव अजय सोनटक्के हे आहेत.