ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपरने मतदान घ्या; समाज क्रांती आघाडीचा मोर्चा
By सुमेध वाघमार | Published: December 20, 2023 06:37 PM2023-12-20T18:37:52+5:302023-12-20T18:39:51+5:30
विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही दोन मोर्चांनी धडक दिली.
नागपूर : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही दोन मोर्चांनी धडक दिली. समाज क्रांती आघाडी व संभाजी ब्रिगेडने मोर्चा काढून आपल्या मागण्या लावून धरल्या. ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरने मतदान घ्या, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या समाज क्रांती आघाडीच्या मोचार्ने लक्ष वेधले.
समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येत विदभार्तील कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जनतेचे प्रश्न मांडण्यात आले. मोर्चात डॉ. गोपाल उपाध्य, बी.जी. पाटील, प्रदीप फुलझेले, दयावान गव्हाणे, आर.आर. पाटील, विजय वानखेडे, सुनील जांभूळकर, सुदाम शेंडे, संजय इंगळे, अशोक वानखेडे, प्रभाकर कासदेकर, अहेमद, सागर बोरकर, धीरज अवताडे, जयराम चिलात्रे, सुनील कासदेकर सहभागी होते.
- या आहेत मागण्या
- सरकारने निर्णय घेऊन केलेले खासगीकरण रद्द करा, कार्यालयांचे पूर्ववत सार्वजनिकीकरण करा.
- केसल त्यांना जमीन द्या
- २०२३ पर्यंतचे सर्व अतिक्रमण नियमित करून मालकी हक्काचे पट्टे द्या.
- जातीनिहाय जनगणना करा
- शाळा बंदचे परिपत्रक रद्द करून शिक्षणाचे खासगीकरण थांबवा
- नोकर भरती करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्या
- सैन्य भरती अग्निपथ बंद करून जुनीच सैन्यभरती कायम करा
- जुनी पेन्शन लागू करा
- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या.