सोलापूर तालुक्यात मोहोड येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द करा;आमदार राजू खरे यांचे आंदोलन
By मंगेश व्यवहारे | Updated: December 21, 2024 12:31 IST2024-12-21T12:31:11+5:302024-12-21T12:31:55+5:30
सोलापूर जिल्ह्यातही मोहोळ तालुक्यातील अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी विधान भवन परिसरात काळे पोशाख व फलक घेऊन आंदोलन केले.

सोलापूर तालुक्यात मोहोड येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द करा;आमदार राजू खरे यांचे आंदोलन
नागपूर: सोलापूर जिल्ह्यातही मोहोळ तालुक्यातील अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी विधान भवन परिसरात काळे पोशाख व फलक घेऊन आंदोलन केले.
राजू खरे विधानभवन परिसरात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वजनदार नेते, माजी आमदार राजन पाटील- अनगरकर यांच्या दबावात अनगर गावात दुय्यम निबंधक कार्यालयापाठोपाठ अलीकडे अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाले. परंतु या कार्यालयास येथील ४० गावांचा विरोध आहे. त्यासाठी येथे कडकळीत बंदही केले गेले होते. या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालून नवीन अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याची मागणी केली गेली होती. परंतु काही झाले नसल्याने हे आंदोलन करत आहे, असे खरे म्हणाले