कर्मचाऱ्याने लावला ज्वेलर्सला १.४५ लाखांचा चुना; नागपुरातील घटना
By योगेश पांडे | Published: June 18, 2024 04:55 PM2024-06-18T16:55:59+5:302024-06-18T16:58:29+5:30
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
योगेश पांडे,नागपूर : ज्वेलरी दुकानात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच मालकाची फसवणूक करत १.४५ लाखांची सोन्याची बिस्कीटे लंपास केली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
राजेश भैय्याजी रोकडे (५२, कॉटन मार्केट) यांचे महालातील बडकस चौक येथे रोकडे ज्वेलर्स नावाचे शोरूम आहे. त्यांच्याकडे कॅश काऊंटरवर विरेंद्र राजेश चौधरी (२६, चंद्रमणी नगर) हा काम करतो. १ जून रोजी सायंकाळी एका ग्राहकाने २० ग्रॅम सोन्याच्या बिस्कीटांची ऑनलाईन ऑर्डर दिली. विरेंद्रने जुन्या ग्राहकाच्या ऑर्डरचे जमा झालेल्या पैशांचे बिल बनवून बिस्कीटांचे बिल झाल्याचे दर्शविले. त्यानंतर त्याने सोन्याचे बिस्कीट घेऊन मालकाचा विश्वासघात केला. हा प्रकार समोर आल्यानंतर रोकडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी विरेंद्रविरोधात गुन्हा नोंदविला असून त्याच्या ताब्यातून सोन्याचे बिस्कीट जप्त केले आहे.